Take a fresh look at your lifestyle.

फडणविसांनी केली ‘महाविकास’ची झोडपट्टी; म्हटले ‘महाविनाश’ची झाली थेट महावसुली आघाडी..!

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचारसभेमध्ये बोलत आहेत. त्यांनी या सभेतून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एकूणच या झोडपट्टीला महाविकास आघाडीचे घटकपक्ष कसे प्रतिक्रिया देतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

फडणवीस यांनी म्हटले की, आपण सारे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात, यापेक्षा आपण सारे मास्क घालून उपस्थित आहात, याचा मला अधिक आनंद आहे. मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला आपण मैदानात उतरविले आहे. विकासाची नवीन वाट मंगळवेढा, पंढरपूरला दाखविण्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद देणार हे नक्की. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे होत नाही. त्यामुळे 15 वर्ष जे सत्तेत होते, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. वीज बिलांना स्थगिती दिली, तेव्हा वाटले राजा उदार झाला. पण, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री म्हणाले आता वसुली सुरू केली आहे.

Advertisement

फडणवीस पुढे म्हतात की, 17 चे मतदान झाले की, हे सरकार पुन्हा 18 पासून तुमची वीज कापणार. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित कोण, तर मुंबईच्या बिल्डरांना 5000 कोटींची सूट दिली. गरिब, शेतकरी यांना मात्र मदत करायला पैसा नाही, हे सांगणारे हे सरकार आहे. पूर्वी हे सरकार होते, महाविकास आघाडी! नंतर झाले, महाविनाश आघाडी! आणि आता झाले, महावसुली आघाडी!!! आज पोलिसांना हप्तेवसुलीचे टार्गेट दिले जात आहेत.

Advertisement

(1) @OfficeOfDevendra on Twitter: “आज राज्यात सरकार आहे की नाही, अशी स्थिती आहे. सारे मंत्री आत्ममग्न, अख्ख सरकार आत्ममग्न! कोरोनात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात. ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर नाही, बेड नाही, अशी अवस्था केली आहे : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis” / Twitter

Advertisement

सरकारमध्ये आले, तेव्हा बांधावर जाऊन सांगायचे, 50 हजार देऊ, दीड लाख देऊ. आपण आज 2000 रूपये कुणाला मिळाले नाही. हे म्हणाले कर्जमुक्ती देऊ. पण, आज जनतेला या सरकारपासून मुक्ती मागण्याची वेळ आली आहे. उस उत्पादकांना सर्वाधिक मदत करण्याची भूमिका मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने घेतली. साखर आणि साखर उद्योगाला वाचविण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले. आमच्या सरकारच्या 5 वर्षांत काळात सिंचनासाठी मोठी कामे प्रारंभ करण्यात आली. दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम केले. 35 गावांमध्ये पाण्यासाठी प्रत्येकवेळी आश्वासन दिले जाते. पण, होत काही नाही. जो निधी लागेल, तो थेट दिल्लीहून आणू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Advertisement

तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की, आज राज्यात सरकार आहे की नाही, अशी स्थिती आहे. सारे मंत्री आत्ममग्न, अख्ख सरकार आत्ममग्न! कोरोनात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात. ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर नाही, बेड नाही, अशी अवस्था केली आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply