Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. व्हेंटिलेटर खरेदीसाठी ५ लाख रुपयांची लाच; भाजपने केला गंभीर आरोप

मुंबई :

Advertisement

सध्या देशभरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांना श्वास घेण्यास अडचणी येत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावावे लागते. अशा रुग्णांना वेळेत व्हेंटिलेटर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच राज्यात व्हेंटिलेटर खरेदीसाठी ५ लाख रुपयांची लाच मागितली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

Advertisement

(1) भाजपा महाराष्ट्र on Twitter: “राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती असतानाही सरकारचे वैद्यकीय अधिकारी मात्र ठाण्यात व्हेंटिलेटर खरेदीसाठी ५ लाख रुपयांची लाच घेत आहे. मुख्यमंत्री @OfficeofUT हा भ्रष्टाचार कधी थांबणार? कोरोनाने जनता आधीच खचून गेली असतानाही सरकारचा भ्रष्ट कारभार काही केल्या बंद होत नाही ! https://t.co/Pe3NsZ5i72” / Twitter

Advertisement

त्यांनी ट्विटरवर एक इमेज शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती असतानाही सरकारचे वैद्यकीय अधिकारी मात्र ठाण्यात व्हेंटिलेटर खरेदीसाठी ५ लाख रुपयांची लाच घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा भ्रष्टाचार कधी थांबणार? कोरोनाने जनता आधीच खचून गेली असतानाही सरकारचा भ्रष्ट कारभार काही केल्या बंद होत नाही !

Advertisement

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरही भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने म्हटले आहे की, ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम आणि भोंगळ कारभारामुळे कोरोनाच्या या संकटात महाराष्ट्राची अशी दयनीय अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात सध्या ‘लोकशाही’ नसून ‘लॉकशाही’ सुरु आहे. तुमचा लॉकडाऊनचा निर्णय हा गोरगरीब जनतेचा जीव घेतोय. हातावर पोट असणाऱ्यांना कोणतीही मदत न करता लॉकडाऊन करून ठाकरे सरकारने त्यांना दुसरा पर्यायच सोडला नाही. या मृत्यूंना केवळ ठाकरे सरकार जबाबदार आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply