Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’; डीए मिळणार तोही ‘इतका’ वाढवून..!

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसापासून महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात कोरोना आल्यापासून केंद्र सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना (central government servant) दिला जाणाऱ्या डीएचा (महागाई भत्ता / DA/ dearness allowance) लाभ गेल्या वर्षी जानेवारीपासूनच थांबविला होता. मात्र, या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण, आता येत्या जुलैपासून पुन्हा डीए दिला जाणार आहे.

Advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. यंदा डीए 17 वरून 28 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल, अशी अपेक्षा व्यक्ती होत आहे. त्याचा फायदा 50 लाखांहून अधिक कर्मचारी, 65 लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले, की 1 जुलैपासून केंद्र सरकारमधील सर्व कर्मचार्‍यांना डीएचा पूर्ण लाभ मिळेल. त्यात त्यांना जानेवारी ते जून 2021 या कालावधीत गोठवलेल्या डीएबरोबरच त्यातील वाढीचा लाभही मिळणार आहे.

Advertisement

AICPI (ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स / all India consumer price Index)च्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून 2021 या कालावधीत डीएमध्ये किमान 4 टक्के वाढ अपेक्षित आहे. शिवाय जानेवारी ते जून 2020 पर्यंत 3 टक्के डीए आणि जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत जाहीर केलेल्या 4 टक्के डीएमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या विद्यमान डीएमध्येही भर घालणे अपेक्षित आहे, जो सध्या 17 टक्के आहे. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळात डीएमध्ये 4 टक्के वाढीस सहमती दर्शविली गेली होती.

Advertisement

महागाई भत्त्यात वाढ केल्याने केवळ पगार (salary) किंवा पेन्शनच (pesion) वाढणार नाही, तर पीएफला देण्यात येणाऱ्या योगदानातही वाढ होईल. त्याचा फायदा आपल्याला भविष्यातील रकमेत होईल. कारण कॉट्रिब्यूशनचे प्रमाण जितके जास्त असेल तितके चांगले एकरकमी व्याज (Bank Loans Interest) अधिक मिळेल.

Advertisement

तीन हप्त्यांचे पैसे दिले जाणार
कोरोनामुळे केंद्र सरकारने 1 जानेवारी ते 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पर्यंत डीए गोठविला होता. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना या तीन हप्त्यांचे पैसे जुलैपासून परत मिळू शकतात. सध्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 17 टक्के दराने डीए मिळतो. वित्त मंत्रालयाच्या (Finance Ministry of India) आकडेवारीनुसार, कोरोना साथीशी लढण्यासाठी वापरला जाणारा डीए गोठवून सरकारने 37,430.08 कोटींपेक्षा जास्त बचत केली होती.

संपादन : सोनाली पवार 

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply