Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. म्हणून बाजाराला बसलाय झटका; इन्व्हेस्टर्सचे कोट्यावधींचे नुकसान

मुंबई :

Advertisement

देशातील सतत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लॉकडाऊन होण्याच्या भीतीने गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. परिणामी आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (सोमवारी) शेअर बाजार लालेलाल झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 813.07 अंक (1.64 टक्के) खाली घसरून 48,778.25 च्या नीचांकावर उघडला. त्याचवेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी (NSE Nifty) 245.90 अंकांनी किंवा 1.66 टक्क्यांनी घसरून 14,589 वर उघडला. आज 386 समभागांमध्ये वाढ झाली, तर तब्बल 1181 समभागांची घसरण झाली आहे. 76 समभागांमध्ये कोणताही बदल झाला नाही. बाजारात विक्रीचा ट्रेंड आहे. (Share Market Today Update)

Advertisement

बाजार भांडवलामध्ये बीएसईची सात लाख कोटींची मोठी घट

Advertisement

बीएसईचे बाजार भांडवल आज तब्बल सात लाख कोटी रुपयांनी घटले आहे. पहिल्या 15 मिनिटांत बाजाराचे वातावरण पूर्णपणे खराब दिसले. लॉकडाऊनच्या भीतीने गुंतवणूकदार काळजीत आहेत. कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात विनाशकारी ठरत आहे. त्याचबरोबर शुक्रवारी अमेरिकेच्या बाजारात तेजी दिसून आली होती. यूएस डा जोन्स 0.89 वाढून बंद झाला. तर, नॅस्डॅक 0.51 टक्के व 70.88 अंकांच्या वाढीसह 13,900.20 वर बंद झाला होता. त्याचप्रमाणे फ्रान्स आणि जर्मनीचे बाजारही तेजीत होते. पण आशियाई शेअर बाजारात घसरण दिसत आहे. हाँगकाँगचा हँगसेन्ग निर्देशांक 373 अंकांनी खाली येऊन 28,305 वर बंद झाला. चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्सही 24 अंकांनी घसरून 3,425 वर आला. कोरियाचा कोस्पी निर्देशांक किरकोळ घसरला. ऑस्ट्रेलियाचा ऑल ऑर्डिनरीज इंडेक्स 37 अंकांनी घसरून 7,214 वर आला. तर, जपानचा निक्केई निर्देशांक 172 अंकांनी खाली 29,596 वर बंद झाला.

Advertisement

आज इन्फोसिस वगळता सर्व शेअर्स घसरले. घसरण झालेल्या शेअरमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, सन फार्मा, नेस्ले इंडिया, डॉक रेड्डी, टीसीएस, रिलायन्स, टेक महिंद्रा, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, पॉवर ग्रिड आणि ओएनजीसी यांचा समावेश आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply