Take a fresh look at your lifestyle.

म्हणून सोन्याचे भाव झालेत कमी; पहा नेमके काय कारण झालेय त्यासाठी

पुणे :

Advertisement

आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती वायदे बाजार (gold & silver market price) आणि मार्केटमध्ये किंचित खाली आल्या आहेत. एमसीएक्सवरील (MCX) सोन्याचा वायदा दर 10 ग्रॅमसाठी 0.03 टक्क्यांनी घसरून 46,580 रुपये झाला, तर चांदीचा वायदा 0.15 टक्क्यांनी घसरून 66,884 रुपये प्रतिकिलो राहिला. मागील सत्रात सोन्याचा दर 0.5 टक्क्यांनी घसरला होता, परंतु आठवड्याभरात त्यास वेग होता.

Advertisement

म्हणून घट

Advertisement

या महिन्याच्या सुरूवातीला भारतात सोन्याच्या किंमती 44,000 रुपयांच्या पातळीवर गेल्या होत्या. जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि कोविड 19 च्या बाबतीत चिंता वाढल्यामुळे बाजारात असे चित्र निर्माण झालेले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा विक्रम नोंदविला होता. विक्रमी पातळीपेक्षा सोने सध्या 10 हजार रुपये स्वस्त आहे.

Advertisement

तर यावर्षी 35 टक्के वाढू शकतात भाव

Advertisement

यावर्षी किरकोळ दागिने उद्योगात 30 ते 35 टक्के वाढ अपेक्षित आहे. इंडिया रेटिंग्सने (India Ratings) एका अहवालात म्हटले आहे की, आर्थिक व्यवहार आणि कोरोनामुळे सोन्याच्या किंमती मंदावल्या आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी त्याच्या व्यवहारांना वेग येईल. यापूर्वी 2020-21 च्या तिसर्‍या तिमाहीत उत्सवाच्या हंगामात लग्नामुळे मागणी वाढली होती. त्यावेळी किमतींमध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाल्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली होती. अहवालानुसार मागणी वाढल्यामुळे 2021-22 मध्ये दागिन्यांची मागणी 30-35 टक्क्यांनी वाढेल.

Advertisement

भारत सोन्याची सर्वात मोठी आयात करणारा देश आहे

Advertisement

भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश आहे. दागिन्यांच्या उद्योगाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मुख्यतः सोन्याची आयात केली जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply