Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात सध्या ‘लोकशाही’ नसून ‘लॉकशाही’ सुरु; म्हणून महाविकास आघाडीवर भाजपचा हल्लाबोल..!

पुणे :

Advertisement

महाराष्ट्र राज्यात करोनाकहर जोमात आहे. त्याचवेळी या सर्वांवर काहीतरी सर्वमान्य आणि शास्त्रीयदृष्ट्या तोडगा कसा काढावा हा प्रश्न अवघ्या जगभरात आहे. अशावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेची अनागोंदी आणि एकूण व्यावसायिक मंडळींना सामोरे जावे लागत असलेल्या संकटांमुळे महाराष्ट्र भाजपने संताप व्यक्त केला आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी जोरदारपणे आरोप आणि टीका केली आहे.

Advertisement

उस्मानाबाद येथील सलून चालकाने आर्थिकदृष्ट्या समस्या येत असल्याने आत्महत्या केली आहे. त्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर त्यांनी लिहिले आहे की, कोरोनाचं माहित नाही, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमचा लॉकडाऊनचा निर्णय हा गोरगरीब जनतेचा जीव घेतोय. हातावर पोट असणाऱ्यांना कोणतीही मदत न करता लॉकडाऊन करून ठाकरे सरकारने त्यांना दुसरा पर्यायच सोडला नाही. या मृत्यूंना केवळ ठाकरे सरकार जबाबदार आहे !

Advertisement

महाराष्ट्रातील वाढते करोना रुग्ण आणि बेड संख्या कमी पडत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधताना भाजपने म्हटले आहे की, राज्यात सर्व काही आलबेल असल्याचं सोंग करणारे मुख्यमंत्री यावर काही बोलतील का? आज तुमच्या आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या तडफदार कामगिरीमुळेच रुग्णांवर खुर्चीवर बसून उपचार घेण्याची वेळ आली आहे !

Advertisement

ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम आणि भोंगळ कारभारामुळे कोरोनाच्या या संकटात महाराष्ट्राची अशी दयनीय अवस्था झाली आहे ! महाराष्ट्रात सध्या ‘लोकशाही’ नसून ‘लॉकशाही’ सुरु आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply