Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेलने सामान्यांचा खिसा खाली; तर सरकारची बक्कळ कमाई, पहा कोणी, किती कमावले..!

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे (petrol and diesel) भाव आकाशाला भिडले आहेत. म्हणजे अक्षरशः खिसाच रिकामा झाला राव.. सामान्यांचे पार कंबरडेच मोडले. काही ठिकाणी तर पेट्रोलने शंभरी पार केली. एकीकडे असे भाव वाढत असताना, केंद्र व राज्य सरकार काही केल्या त्यावरील कर कमी करायला तयार नाही. सामान्यांची अवस्था म्हणजे, ‘मुकी बिचारी कोणीही हाका..’ अशी झालीय..

नागरिकांचे पाकीट खाली होत असताना, कराच्या रूपातून सरकारची मात्र बक्कळ कमाई झाली. पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर आकाराला जातो, त्यातून त्यांची किती कमाई होते, मागील आर्थिक वर्षात कोणी किती कमाई केली, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर ही बातमी वाचा..

मणिपूर, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि आसाम या राज्यांमध्ये इंधनावर सर्वाधिक कर लावला जातो. देशातील अनेक शहरांत पेट्रोलची किंमत १०० रुपये, तर डिझेलची किंमत ९० रुपये प्रति लिटरवर पोचली आहे. पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याच्या मागणीसाठी राजस्थानातील पेट्रोल-डिझेल पंपचालकांनी बंद पाळूला होता.

लक्षद्विपमध्ये व्हॅट नाही
मणिपूरमध्ये पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक व्हॅट (VAT) लावण्यात येतो. इथे पेट्रोलवर ३६.५० टक्के, तर डिझेलवर २२.५० टक्के कर वसूल केला जातो. मोठ्या राज्यांचा विचार केल्यास तमिळनाडूमध्ये सर्वात कमी व्हॅट आहे. इथे पेट्रोलवर १५ टक्के, डिझेलवर ११ टक्केच कर आकारण्यात येतो. मात्र, पेट्रोलवर १३.०२ रुपये आणि डिझेलवर ९.६२ रुपये प्रति लिटर सेससुद्धा आकारण्यात येतो. बहुतांश राज्य सरकारे सेसची वसूली करतात. लक्षद्विप हा एकमेव केंद्रशासित प्रदेश असा आहे, की जिथे व्हॅट लावत नाही.

महाराष्ट्राने केली सर्वाधिक कमाई
पेट्रोल-डिझेलवरील करातून मिळणाऱ्या उत्पन्नात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या लक्षात घेता ते सहाजीकही आहे म्हणा. २०१९-२० या आर्थिक वर्षात महाराष्ट्र सरकारला व्हॅटच्या (VAT and GST) माध्यमातून २६ हजार ७९१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारचा क्रमांक येतो. उत्तर प्रदेश सरकारला २०१९-२० मध्ये २० हजार ११२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मागील वर्षी (२०१९-२०) कोणत्या राज्याने किती कमावले?

महाराष्ट्र- 26,791 कोटी रुपये
उत्तर प्रदेश- 20,112 कोटी रुपये
तमिळनाडू – 18,175 कोटी रुपये
कर्नाटक – 15,381 कोटी रुपये
गुजरात – 15,337 कोटी रुपये
राजस्थान – 13,319 कोटी रुपये
मध्य प्रदेश – 10,720 कोटी रुपये
आंध्र प्रदेश – 10,168 कोटी रुपये
तेलंगना – 10,045 कोटी रुपये
केरळ – 8,074 कोटी रुपये

वर्षनिहाय सर्व राज्यांचे व्हॅटद्वारे उत्पन्न

2014-15 – 1.37 लाख कोटी रुपये
2015-16 – 1.42 लाख कोटी रुपये
2016-17 – 1.66 लाख कोटी रुपये
2017-18 – 1.85 लाख कोटी रुपये
2018-19 – 20.12 लाख कोटी रुपये
2019-20 – 20.00 लाख कोटी रुपये

मूळ किंमत अजूनही जुनीच
पेट्रोलची मूळ किंमत (बेस प्राईस) अद्यापही ३३ रुपये आणि डिझेलची मूळ किंमत ३४ रुपये इतकीच आहे. मात्र, केंद्र सरकार त्यावर ३३ रुपये कर आकारते. राज्य सरकारसुद्धा यावर व्हॅट आकारणी करते. काही राज्यात इंधनावर सेससुद्धा आकारला जातो. या सर्व करांमुळे इंधनाचे दर तिपटीने वाढल्याचे दिसते.

प्रत्येक शहरात वेगळा भाव कसा?
तुम्ही जर विविध ठिकाणी पेट्रोल-डिझेल भरत असाल, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर असल्याचे तुमच्या लक्षात येईल. असे का होत असेल, तर कोणताही पेट्रोलपंप ऑइल डेपोपासून किती अंतरावर आहे, यानुसार वाहतूक खर्च कमी-जास्त होतो. त्यामुळेच प्रत्येक शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर निरनिराळे असतात. अर्थात, हा खर्चही तुमच्याकडूनच वसूल केला जातो.

संपादन : सोनाली पवार 

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply