Take a fresh look at your lifestyle.

शेळीपालन : शेळ्यांना माजावर आणण्यासाठीचे ‘हे’ आहेत उपाय; वाचा महत्वाची माहिती

शेळ्यांचा माज वेळीच ओळखून त्यांना बेणूचा बोकड दाखवण्याची काळजी घेणे हे चांगल्या शेळीपालकाचे आद्यकर्तव्य आहे. कारण, एक माज हुकला तर मग पुढे किमान २० दिवस शेळ्यांचे करडे देण्याचे सायकल (वर्तुळ) ढकलले जाते. अशावेळी मग त्या शेळ्यांचे संगोपन आणि खाद्य यावरील खर्च वाढतो. हा खर्च वाढणे म्हणजेच उत्पादन खर्चात वाढ.

Advertisement

उत्पादन-खर्च जितका कमी तितकी नफ्याची शक्यता जास्त. असे गणित असल्याने मग चुकलेला माज गोट फार्मिंगमध्ये मोठा महाग असतो. जातवान आणि योग्य वेळी माजावर येऊन पुनरुत्पादन करणाऱ्या शेळ्यांची निवड करून कळपाची वृद्धी हे दोन्ही घटक लक्षात घेऊन नियोजन करावे लागते. शेळी नियमित माजावर येत असल्यास उत्तम. मात्र, जर तिचा माज अनियमित असेल तर तो त्या पद्धतीने अनियमित का आहे हे शोधून काढावे. मात्र, त्यात काहीही वेळापत्रकानुसार चूक वाटत असल्यास त्यासाठीचे काही महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  • भाकड शेळ्या म्हणजे कमी चारा देण्यासह दुर्लक्ष करण्याची गोष्ट. असेच अनेकांना वाटते. मात्र, तसे नाही. उलट शेळ्या वेळेवर माजावर येण्यासाठी अशावेळी त्यांचे सकस आहार व योग्य औषधोपचार करून त्यांना पुढील पुनरुत्पादनासाठी तयार करण्याचा हा महत्वाचा काळ असतो.
  • शेळ्यांना नियमित लसीकरण करून घ्यावे. ऋतुचक्र लक्षात घेऊन आणि त्यांची गरज लक्षात घेऊन औषधोपचार आणि चारा यांचे योग्य नियोजन करावे.
  • शेळ्यांना प्रत्येक तीन महिन्यांनी जंतनाशके पाजून घ्यावेत.
  • लहान करडे शेळ्यांसमवेत ठेऊन नयेत. त्यामुळे त्यांना माजावर येण्याचा कालावधी वाढू शकतो.
  • अनुवंशिक दोष असलेल्या शेळ्या कळपामध्ये अजिबात ठेऊ नयेत.
  • प्रथिने, स्फुरद, क्षार आणि कॅल्शियमयुक्त संतुलित आहार सर्व शेळ्यांना नियमित द्यावा.
  • शेळीला गर्भाशयाचा आणि योनीमार्ग यांचा दाह होणार नाही याची काळजी घ्या.
  • कळपातील शेळ्या शक्यतो नर-मादी अशा पद्धतीने जन्मलेल्या करडातील निवडू नका. मादी-मादी अशा निवडलेल्या शेळ्यांचा माज वेळेवर येण्यासह त्यांची प्रजोत्पादन क्षमता चांगली असते.

शेळ्यांना काहीही त्रास झाला तर लगोलग पशुवैद्यकीय तज्ञांना दाखवावे. सुबाभूळ, शेवरी, बाभूळ, रामकाठी, बोर, शमी (सौंदड), कडूनिंब, विलायती / इंग्रजी चिंच, उंबर, पिंपल, वडाचे झाड, अंजन, भेंडी, ग्लीरीसिडीया (गिरिपुष्प), बकान, जांभूळ, मलबेरी, आपटा, कांचन, धेंचा, धामण, सिसम, बाबुल शेंगा, टाकळा, वेडीबाभूळ आदि वनस्पती शेळ्यांना खायला आवडतात. अशा वनस्पतींचा पाला खाल्ल्याने त्यांचे भरण-पोषण उत्तम होते.

Advertisement

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

Advertisement

(क्रमशः)

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळी पालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply