Take a fresh look at your lifestyle.

Live Update : ‘त्यावेळी’ होणार लॉकडाऊनचा निर्णय; पहा नेमकी काय चर्चा झाली टास्क फोर्सच्या बैठकीत

मुंबई :

Advertisement

राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची चर्चा सुरू असतानाच मुंबईत करोना रुग्णांच्या वाढीच्या मुद्द्यावर टास्क फोर्सची बैठक चालू होती. बैठक संपली असून याबाबत राज्यातील जनतेची भावना लक्षात घेऊन लगोलग लॉकडाऊन लागू न करता दि. 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

Advertisement

(1) ABP माझा on Twitter: “राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? टास्कफोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरुच #LockdownMaharashtra #Lockdown #Maharashtra https://t.co/BXVqqghWXy” / Twitter

Advertisement

अनेकांनी गुढीपाडवा आणि सणासुदीच्या कालावधीकडे लक्ष वेधत लॉकडाऊन नंतर लागू करण्याची मागणी केली होती. सत्ताधारी शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचीही अशीच मागणी होती. त्यामुळे मग जनभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगोलग तातडीने लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केलेली नाही.

Advertisement

बैठकीत पुढील मुद्द्यांवर झाली चर्चा :

Advertisement
  1. लॉकडाऊनची दाहकता किती अशी कशी ठेवायची
  2. किती दिवसांचे लॉकडाऊन करावे
  3. राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी करावी
  4. बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे 
  5. बुधवारनंतर कॅबिनेटची बैठक होणार

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना टोपे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच लॉकडाऊनची घोषणा करतील. लॉकडाऊन लावण्यासाठी टास्क फोर्स तयार आहे. बुधवारनंतर कॅबिनेटची बैठक होणार आहे.  लॉकडाऊनसंदर्भात अर्थ विभाग आणि इतर विभागांशी चर्चा होईल. त्यानंतर 14 एप्रिलनंतर कॅबिनेटची बैठक होणार आणि या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातला निर्णय घेतील.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply