Take a fresh look at your lifestyle.

Live Update : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबद्दल केले भाष्य; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार किंवा नाही, याबाबत सध्या चर्चेच्या वावड्या उठवल्या जात आहेत. अनेकांना लॉकडाऊन होणार असेच वाटत आहे. तर, अनेकांना आता त्या मुद्द्याचा वापर न करावा असे वाटत आहे. अशावेळी राज्याच्या टास्क फोर्सची बैठक चालू आहे. तर, तिकडे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे.

Advertisement

Dr Harsh Vardhan on Twitter: “.@IndiaTVHindi के कार्यक्रम में मैंने लॉकडाउन से जुड़े एक सवाल के ज़वाब में कहा कि व्यक्तिगत रूप से मुझे नहीं लगता कि लॉकडाउन की ज़रूरत है या इसकी नौबत आएगी। लॉकडाउन के बजाय लोगों को कोरोना अनुरूप व्यवहार के पालन पर ज़ोर देना चाहिए। @PMOIndia #TikaUtsav https://t.co/5EubV9oqoq” / Twitter

Advertisement

डॉ. हर्ष वर्धन यांनी टीव्ही नाईन यांच्यासोबत बोलताना म्हटले आहे की, लॉकडाउनशी संबंधित प्रश्नाला मी उत्तर दिले  आहे. वैयक्तिकरित्या मला असे वाटत नाही की लॉकडाउन आवश्यक आहे किंवा त्याची गरज पडेल. लॉकडाउनऐवजी लोकांनी एकमेकांची काळजी घेऊन नियमांचे पालन करण्यावर जोर दिला पाहिजे.

Advertisement

त्याचवेळी राज्यातील जनतेला लॉकडाऊनच्या मुद्द्यावर मानसिकदृष्ट्या तयार करण्याचे काम महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. यावर रोहित पवार यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नाईलाजाने #lockdown करण्याची वेळ आलीय, पण लॉकडाऊन नाही केला तर ही साखळी अशीच वाढत जाऊन आपली आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते आणि असं झालं तर होणारी हानी अपरिमित असेल.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कोविड परिस्थितीवर राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नाईलाजाने #lockdown करण्याची वेळ आलीय, पण लॉकडाऊन नाही केला तर ही साखळी अशीच वाढत जाऊन आपली आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते आणि असं झालं तर होणारी हानी अपरिमित असेल. https://t.co/cTYKbpnNpa https://t.co/lLp5b2pqRG” / Twitter

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply