Take a fresh look at your lifestyle.

IPL Update : हैदाराबादची ‘ही’ आहे जमेची बाजू; तर कोलकाताला ‘त्यांची’ निवड करण्याचे आव्हान..!

मुंबई :

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सत्रातील तिसऱ्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. दोन्ही संघ कागदावर खूप संतुलित दिसत आहेत. आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाची कामगिरी बरीच प्रभावी ठरली आहे. त्याचबरोबर कोलकाता संघाने दोन वेळा आयपीएलचे जेतेपदही जिंकले आहे. दोन्ही संघ स्टार खेळाडूंनी परिपूर्ण आहेत, त्यामुळे आज अत्यंत रोमांचक सामना होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या लिलावातून काही सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड केली असून त्यात साकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग या नावांचा समावेश आहे. तथापि, चार विदेशी खेळाडू निवडणे इयोन मॉर्गनसाठी कठीण काम असेल. टॉप ऑर्डरमध्ये संघात शुभमन गिल, नितीश राणा असे तरूण फलंदाज आहेत तर मधल्या फळीत संघाला कर्णधार मॉर्गन, दिनेश कार्तिकचा अनुभव आहे. शेवटच्या षटकात आंद्रे रसेलकडे मोठ्या धावसंख्येकडे संघाला नेण्याची ताकत आहे. तर गोलंदाजीत संघाकडे पॅट कमिन्स आणि सुप्रसिध्द कृष्णाच्या रूपात चांगले टी २० गोलंदाज आहे आणि हरभजन सिंगच्या आगमनाने संघाचा फिरकी विभागही बळकट दिसत आहे.

Advertisement

यंदाच्या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडे बऱ्यापैकी संतुलित टीम आहे. केदार जाधवच्या आगमनाने संघाची मधली फळी ही पूर्वीपेक्षा मजबूत बनणार आहे. या संघात वॉर्नर आणि बेअरस्टोच्या रूपात दोन सलामीवीर आहेत. त्याचबरोबर केन विल्यमसनने संघासाठी सलग धावा केल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. मनीष पांडेला पुन्हा एकदा स्वत: ला सिद्ध करण्याची संधी असेल. गोलंदाजीत राशिद खानकडे भारतीय खेळपट्टयांवर कोणत्याही फलंदाजीचा क्रम नष्ट करण्याची क्षमता आहे. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून संघात सामील झाले आहेत.

Advertisement

आयपीएल २०२१ चा हा तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज रविवारी ११ एप्रिल रोजी चेन्नईच्या एम चिंदाबरम क्रिकेट स्टेडियमवर होईल. सामना भारतीय वेळेनुसार साडेसात वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पहायला मिळेल. शिवाय या सामन्याचे थेट प्रक्षेपण डिस्ने + हॉटस्टार ॲपवर पाहता येईल. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply