Take a fresh look at your lifestyle.

IPL Info.: वाचा ‘आयपीएल’मधील फलंदाजीची ही रोचक आकडेवारी; भन्नाट माहितीमुळे वाढेल तुमचीही रुची..!

मुंबई :

Advertisement

आयपीएलच्या १४ व्या हंगामास आता सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने यंदाचा हंगाम सुरु झाला असून पुढील दोन महिने तो चालणार आहे. जगभर आश्चर्य वाटत असलेल्या या स्पर्धेची काही माहिती पाहिल्यानंतर आयपीएल पाहण्याची मजाही दुप्पट होईल. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, चौकार आणि षटकार याबाबत जाणून घेवू यात.

Advertisement

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार असलेल्या विराटने ५ हजार ८७८ धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना असून त्याने ५ हजार ३६८ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर असून त्याने ५ हजार २३० धावा केल्या आहेत.
पंजाब किंग्जच्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक ६ शतके ठोकली आहेत. विराट कोहलीने ५ शतके आणि डेव्हिड वॉर्नरने ४ शतके केली आहेत. सीएसकेचा माजी फलंदाज शेन वॉटसनने ४ तर आरसीबीच्या एबी डिव्हिलियर्सने ३ शतके ठोकली आहेत.

Advertisement

सिक्सर मारण्यात ख्रिस गेल आघाडीवर असून त्याने ३४९ षटकार मारले आहेत. एबी डिव्हिलियर्सने २३५, महेंद्रसिंग धोनीने २१६, रोहित शर्माने २१३ आणि विराट कोहलीने २०१ षटकार ठोकले आहेत. चौकारांमध्ये शिखर धवन ५९१ चौकारांसह अव्वल स्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नर ५१०, विराट कोहली ५०३, सुरेश रैना ४९३ आणि गौतम गंभीरने ४९१ चौकार ठोकले आहेत.

Advertisement

वैयक्तिक धावसंख्येच्या प्रकारात ख्रिस गेलने पुण्याविरुद्ध ६६ चेंडूंत १७५ धावा केल्या आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने आरसीबीविरुद्ध ७३ चेंडूत १५८ धावा केल्या असून मुंबईिवरुद्ध एबी डिव्हिलियर्सने ५९ चेंडूंत १३३, केएल राहुलने आरसीबीविरुद्ध १२२ आणि गुजरातच्या विरुद्ध डीव्हिलियर्सने १२२ धावा ठोकल्या आहेत.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी 

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply