Take a fresh look at your lifestyle.

धोनीच्या निवृत्तीबद्दल सीएसकेच्या CEO ने केले ‘हे’ सुतोवाच; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. आयपीएल २०२० मध्ये सीएसकेची कामगिरी चांगलीच खराब होती. युएईमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाही. यानंतर धोनीच्या सेवानिवृत्त होण्याविषयी अटकळ बांधली जात होती. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, आयपीएल २०२१ हा खेळाडू म्हणून एमएस धोनीचा शेवटचा हंगाम असणार नाही. आयपीएल २०२१ नंतरही तो यष्टिरक्षक म्हणून संघात राहील.

Advertisement

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन म्हणाले की, मला वैयक्तिकरित्या वाटते की एमएस धोनीची ही शेवटची आयपीएल असणार नाही. धोनीचा पर्याय म्हणून सीएसके दुसऱ्या कोणाकडे पाहत नसल्याचेही ते म्हणाले. विश्वनाथन म्हणाले, ‘पहा, मला वाटत नाही की हे एमएस धोनीचे शेवटचे वर्ष आहे. हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे आणि मला वाटत नाही की आम्ही इतर कोणावरही लक्ष केंद्रित करत आहोत. सीएसकने धोनीच्या नेतृत्वात तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

Advertisement

काशी विश्वनाथन पुढे म्हणाले की, यावर्षी संघाची परिस्थीती चांगली आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून खेळाडू सराव करत आहेत. आणि आम्ही आमच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवतो. याबद्दल कर्णधार अगदी स्पष्ट आहे. आपण प्रक्रिया योग्यरित्या केली पाहिजे आणि प्रक्रिया ठीक राहिल्यास निकाल येईल. सीएसके आज शनिवारी आयपीएल २०२१ मध्ये त्यांची मोहीम सुरू करणार आहे. सीएसकेचा सामना दिल्ली कॅपिटलशी होईल.  

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी 

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply