Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वेंकटेश प्रसाद आमिरला म्हणाला ‘मी इंदिरा नगरचा गुंडा आहे’..!

मुंबई :

Advertisement

९ मार्च १९९६ ला विश्वचषकातील पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांविरूद्ध मैदानात उतरले होते. टीम इंडियाने या सामन्यात पाकिस्तानला ३९ धावांनी पराभूत केले होते. भारताकडून नवज्योतसिंग सिद्धूने ९३ धावांची उत्कृष्ट फलंदाजी केली तर गोलंदाजीमध्ये व्यंकटेश प्रसादने तीन पाकिस्तानी फलंदाजांना घरचा रस्ता दाखविला. व्यंकटेशच्या नावावर असलेल्या विकेटमध्ये सर्वात महत्त्वाची विकेट होती ती आमिर सोहेलची. सोहेलने त्या सामन्यात ५५ धावांची तुफानी खेळी खेळली होती. दरम्यान, माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश यांचे एक ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने आमिरला लिहिले आहे की तो इंदिरा नगरचा गुंड आहे.

Advertisement

व्यंकटेश प्रसादने आपल्या ट्विटर हँडलवर त्या सामन्याच्या दोन छायाचित्रांचे कोलाज शेअर केले आहे. त्याच्या पहिल्या बाजूला आमिर सोहेल वेंकटेशच्या दिशेने बॅट दाखवत काही इशारा देताना दिसत आहे, तर फोटोच्या दुसऱ्या बाजूला आमिर सोहेल व्यंकटेशच्या चेंडूवर बोल्ड झाल्याचे दिसत आहे. भारताच्या या माजी वेगवान गोलंदाजाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी आमिर सोहेलला बेंगलुरुमध्ये १४.५ षटकांत सांगितले की मी इंदिरा नगरचा गुंडा आहे.’ प्रसादचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Advertisement

Venkatesh Prasad on Twitter: “Me to Aamir Sohail in Bangalore at 14.5- #IndiraNagarkaGunda hoon main 😊 https://t.co/uF7xaPeTPl” / Twitter

Advertisement

व्यंकटेश यांच्या ट्विटवर भाष्य करताना पाकिस्तानच्या एका पत्रकाराने लिहिले की, प्रसाद यांची कारकीर्दीतील ही एकमेव उपलब्धी आहे. यावर माजी वेगवान गोलंदाजाने चोख उत्तर दिले, ‘नाही मजीब भाई, इंग्लंडमधील १९९९ च्या विश्वचषकात मी मॅनचेस्टरमध्ये पाकिस्तानविरुद्ध २७ धावा देत ५ बळी घेतले होते यामुळे पाकला २२८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही.’

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply