Take a fresh look at your lifestyle.

वाझे प्रकरण : पोलीस अधिकारी काझी यांना अटकेसह आणखी ‘त्या’ दोघांनाही समन्स..!

मुंबई :

Advertisement

अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरेम मृत्यू प्रकरणात एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) मोठी कारवाई केली आहे. अँटिलिया प्रकरणाचा तपास चालू असताना एनआयएने रविवारी मुंबई पोलिस अधिकारी रियाज काझी यांना अटक केली आहे.

Advertisement

एजन्सीने म्हटले आहे की, मुंबई पोलिस अधिकारी रियाजने काझी यांनी सचिन वाझे याला अँटिलीया प्रकरणात मदत केली होती. वाझे याच्याप्रमाणेच रियाज काझी हे सहायक पोलिस निरीक्षक आहेत. 5 मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंबईत सापडला होता. तर, 25 फेब्रुवारीला सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी केली होती. याप्रकरणी वाझे याला 13 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

Advertisement

एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, अंबानी यांचे घर अँटिलीयाबाहेर स्फोटके ठेवल्यानंतर वाझे मोठा कट रचण्याच्या प्रकरणात सापडला आहे. आता प्रदीप शर्मा यांनी वाझेला रसद पुरविली की नाही याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचीही चौकशी केली जात आहे.

Advertisement

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर आता याचा तपास करणार्‍या सीबीआय पथकाने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून देशमुख यांच्या दोन वैयक्तिक कर्मचार्‍यांना समन्स बजावले आहेत.

Advertisement

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुख यांना नुकतेच महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) पथकाने मंगळवारी मुंबई गाठली आणि सर्व संबंधित कागदपत्रे गोळा केली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही चालू आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply