Take a fresh look at your lifestyle.

गुजरातमध्येही करोनाकहर; पहा नेमकी काय आहे त्या राज्यातील परिस्थिती

पुणे :

Advertisement

महाराष्ट्र राज्याच्या शेजारी आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गुजरात राज्यातही करोना रुग्णसंख्या हा मोठा गंभीर मुद्दा बनला आहे. तिथे अहमदाबाद शहरात सध्या रेमिडीसिव्हीर या औषधासाठी मोठी झुंबड उडाली आहे. औषधांचा पुरवठा कमी असतानाच खासगी रुग्णालये सरसकट हे औषध वापरायला लावत असल्याने महाराष्ट्र आणि इतर राज्यांप्रमाणे तिथेही याचा काळाबाजार होण्यास सुरुवात झाल्याच्या बातम्या येत आहेत.

Advertisement

Deepal.‏‎‎Trivedi on Twitter: “Ppl in #Ahmedabad waiting for #Remdesivir infections for #COVID19 infected kin.Public is desperate but #BJP in #Gujarat bragged of “managing” 5000 injections & distributing it free from their Party office. Is this the time for cheap #herogiri & IT cell marketing? #GujaratModel https://t.co/QdcWbljEDh” / Twitter

Advertisement

मागील 24 तासात त्या राज्यात 5 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर, 49 जणांचा कोविड 19 आजाराने मृत्यू झालेला आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 2525 लोकांना रुग्णालयातून सुट्टीही देण्यात आली आहे. सक्रिय प्रकरणांची संख्या 25,129 पर्यंत वाढली असून त्यापैकी 192 लोक व्हेंटिलेटर लाइफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. 1 एप्रिलपासून राज्य सरकारने कोणत्याही इतर राज्यातील प्रवाशांना आरटी-पीसीआर तपासणीचा नकारात्मक अहवाल आणणे बंधनकारक केले आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची सखोल तपासणी केली जात आहे.

Advertisement

कोरोना विषाणूची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आगामी गांधीनगर महानगरपालिका (जीएमसी) निवडणुका तहकूब करण्याची विनंती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगास केली आहे. आयोगाच्या मतदानाच्या वेळापत्रकानुसार जीएमसीसाठी 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर 20 एप्रिल रोजी मतमोजणी होईल.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply