Take a fresh look at your lifestyle.

मग भाजप उतरणार आंदोलनाच्या रिंगणात; पहा नेमके काय म्हटलेय महाराष्ट्र आघाडीने

मुंबई :

Advertisement

सध्या करोना विषाणूचे आरोग्याचे मुद्दे कमी आणि राजकीयदृष्ट्याच याचा आगडोंब उसळलेला आहे. अशावेळी लस कमी मिळणे आणि केंद्र सरकारचे राज्य सरकारला सहकार्य न मिळण्याचा मुद्दा राज्यभरात चर्चेत आहे. बिगर भाजप राज्यांतील सरकारांनी यावर लक्ष वेधले आहे. त्यात महाराष्ट्र राज्यही आहे. अशावेळी महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलनाची तयारी केली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील मंत्र्यांनी व जिल्हा प्रशासनाने यांनी राज्यभरात लॉकडाऊन होणार किंवा नाही, याचे कोडे मांडले आहे. त्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. काही मंत्री लॉकडाऊन लागू करण्यासाठी आग्रही आहेत. तर, काहींनी विरोध केलेला आहे. त्याचवेळी राज्यभरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ‘यशस्वी’ आंदोलन केल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आता पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “कोरोनावरून राजकारण होऊ नये अशी अपेक्षा माननीय मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करतात आणि दुसरीकडे मात्र लसींचा तुडवडा निर्माण करीत, केंद्र लसी पुरवत नाही अशी बोंब ठोकतात. राज्य सरकारने हा दुतोंडी कारभार थांबवावा अन्यथा भाजपा आंदोलन करेल. – @ShivarayK https://t.co/WNUSBxtYU9” / Twitter

Advertisement

महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते शिवराज कुलकर्णी यांनी याबाबत म्हटले आहे की, कोरोनावरून राजकारण होऊ नये अशी अपेक्षा माननीय मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करतात आणि दुसरीकडे मात्र लसींचा तुडवडा निर्माण करीत, केंद्र लसी पुरवत नाही अशी बोंब ठोकतात. राज्य सरकारने हा दुतोंडी कारभार थांबवावा अन्यथा भाजपा आंदोलन करेल.

Advertisement

त्यावर आता सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष कोणती प्रतिक्रिया देतात, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply