Take a fresh look at your lifestyle.

‘आवेश’ नडला आणि धोनी बोल्ड आऊट झाला; पहा कसा अन कितीवेळा माही झालाय शून्यावर आउट..!

मुंबई :

Advertisement

सुरेश रैना पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरला अन लाखो चाहत्यांना आनंद झाला. तेव्हा प्रत्येकाची इच्छा होती की आज माहीची बॅट जोरदार तळपणार. धोनीने ज्याप्रकारे पहिला चेंडू खेळला ते पाहताच तो आज आक्रमक फलंदाजी करणार असे वाटले. मात्र, अवेश खानच्या चेंडूवर जोरात शॉट मारण्याच्या नादात धोनी खाते न उघडताच बोल्ड आऊट झाला. तेव्हा लाखो क्रिकेटप्रेमींच्या आशा धुळीस मिळाल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही चौथी वेळ होती जेव्हा धोनी शुन्यावर बाद झाला.

Advertisement

चेन्नई सुपर किंगच्या इनिंगच्या १५ व्या षटकातील तिसऱ्या बॉलवर धोनीला अवेश खानने बोल्ड केले, त्यानंतर त्याने ही मोठी विकेट मिळाल्यावर मोठ्या उत्साहाने आनंद साजरा केला. मात्र, धोनी बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या सॅम करनने पहिल्याच चेंडूवर दिल्लीच्या गोलंदाजांना ठोकण्यास सुरुवात केली आणि चौकाराने आपले खाते उघडले. सॅम करणने अवघ्या १५ चेंडत ३४ धावा केल्या. सुरेश रैनाने ३६ चेंडूत ५४ धावांची शानदार खेळी खेळली. यामुळे चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावून १८८ धावा केल्या.

Advertisement

१८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल संघाचे धवन आणि शॉ यांनी जोरदार सुरुवात केली आणि दोघांनीही पॉवरप्लेच्या दरम्यान ६६ धावा केल्या. शॉने केवळ २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि दिल्लीने केवळ १०.१ षटकांत १०० धावा पूर्ण केल्या. शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आणि सुरुवातीच्या षटकांत त्याने चौकारांचा पाऊस पाडला. ड्वेन ब्राव्होने डावाच्या १४ व्या षटकात पृथ्वी शॉला ७२ धावांवर आउट केले. यानंतर शार्दुल ठाकूरने १७ व्या षटकात ८५ धावांवर धवनला रोखले. कर्णधार पंतने १२ चेंडूत १५ धावांची नाबाद खेळी साकारून संघाला विजय मिळवून दिला.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply