Take a fresh look at your lifestyle.

मग तुम्हालाही मिळेल पेन्शन; त्यासाठी फक्त ‘एवढं’ करा, वाचा महत्वाची माहिती

भविष्याची काळजी प्रत्येकालाच असते. त्यासाठी प्रत्येक जण काहीतरी जमापुंजी राखून ठेवत असतो. मात्र, अनेकदा काहीतरी अडचण येते नि खिशा खाली होतो. म्हातारपण तर सर्वात वाईट. मुलांनी नाही सांभाळले तर काय करणार? वृद्धाश्रमात राहण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी भीती अनेकांना वाटते. सरकारी नोकरदारांचे बरे असते, त्यांना पेन्शन मिळते; पण सर्वसामान्यांचे काय? आपल्यालाही पेन्शन मिळाली तर किती बरं होईल ना.. पण आता भविष्याची चिंता सोडा. कारण आता तुम्हीही म्हातारपणात पेन्शन मिळवू शकता..

आम्ही तुम्हाला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation Of India Ltd. / LIC / एलआयसी) योजनेबद्दल सांगत आहोत. ज्यात तुम्ही एकदा गुंतवणूक (Investment) केली तरी, तुमच्या आयुष्याची काळजी मिटू शकते. एलआयसीची ही काय योजना आहे, त्यात तुम्हाला किती पैसे मिळू शकतात जाणून घेण्याची उत्सुकता आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Advertisement

एलआयसीची जीवन शांती योजना (Jeevan Shanti Scheme) ही एक नॉन-लिंक्ड योजना आहे. म्हणजे आपण या योजनेत एकरकमी गुंतवणूक करु शकता. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन (Pension) मिळणार आहे. ही पेन्शन कधीपासून सुरु करायची याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच त्वरित किंवा 5, 10, 15 वा 20 वर्षांनंतरही तुम्हाला पेन्शन सुरू करण्याचा पर्याय असेल. अर्थात पेन्शनची रक्कमही 5, 10, 15 किंवा 20 वर्षांच्या पर्यायांमध्येच वाढेल. समजा, तुम्ही 45 वर्षांचे आहात. या योजनेत तुम्ही 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर वर्षाकाठी तुम्हाला ७४ हजार ३०० रुपये पेन्शन मिळेल. आपण मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर परतावादेखील मिळवू शकता.

कुटुंबालाही योजनेचा फायदा
एलआयसी जीवनशांती योजना ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीनेही खरेदी करू शकता. जीवनशांती ही सर्वसमावेशक योजना आहे. म्हणजेच गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबालाही या योजनेचा फायदा होतो. ही योजना कोणीही घेऊ शकतो. फक्त त्यासाठी कमीत कमी ३०, तर जास्तीत जास्त ८५ वर्षांची वयोमर्यादा आहे. आपण या पॉलिसीवर (Insurance Policy) कर्जदेखील (Loans) घेऊ शकता. पॉलिसीशी संबंधित समस्या असल्यास, आपण 3 महिन्यांनंतर कधीही शरण जाऊ शकता. त्यासाठी वैद्यकीय दस्तऐवजाची गरज नाही.

संपादन : सोनाली पवार

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply