Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल २०२१ : बाब्बो.. भारताचा ‘हा’ दुसरा दिग्गज खेळाडूही झाला जखमी..!

मुंबई :

Advertisement

आयपीएल २०२१ ला सुरु होवून दोन दिवस झाले आहेत आणि दोन दिवसांत भारतीय क्रिकेट संघासाठी दोन वाईट बातमी आल्या आहेत. ही बातमी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या दुखापतीशी संबंधित आहे. पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला खांद्याला जखम झाली. आता दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात इशांत शर्मा अनफिट असल्याचे समोर आले आहे. त्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. यामुळे इशांत शर्मा चेन्नई विरुद्ध पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्येही तो जखमी झाला होता. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन केले होते.

Advertisement

दिल्ली कॅपिटल कॅम्पमधून मिळालेल्या माहितीनुसार, इशांत शर्मा पूर्णपणे फिट नाही. यामुळे चेन्नईिवरुद्धच्या सामन्यात त्याचा समावेश झाला नाही. तो सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आला नव्हता, तो हॉटेलमध्येच राहिला. आयपीएल २०२० मध्ये इशांत जखमी झाल्याने त्याला स्पर्धा मध्यभागी सोडावी लागली होती. यानंतर तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकला नाही. सीएसकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान इशांतशिवाय उमेश यादवलाही दिल्लीने मैदानात उतरवले नाही.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजांची जोडी कॅगिसो रबाडा आणि एरिक नोर्खियासुद्धा या सामन्यात खेळू शकले नाहीत. या दोघांचा क्वारंटाईन कालावधी अद्याप पूर्ण झालेली नाही. काही दिवसांपूर्वी ते भारतात आले होते. अशा प्रकारे, दिल्ली कॅपिटलची टीम पहिल्या सामन्यात चार मोठ्या गोलंदाजांशिवाय मैदानात उतरली होती. चेन्नईिवरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघ व्यवस्थापनाने युवा गोलंदाज अवेश खानला संधी दिली. अवेशने संधीचा फायदा उठविला आणि दोन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने फाफ डू प्लेसी आणि महेंद्रसिंग धोनी या दोन मोठ्या खेळाडूंना बाद केले.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply