Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल २०२१ : अन ‘अशा धडाकेबाज पद्धती’ने पृथ्वी शॉने टीकाकारांची तोंडे केली बंद..!

मुंबई :

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटलचा सलामीवीर पृथ्वी शॉने सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. पृथ्वी शॉने चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक ठोकले. या स्फोटक फलंदाजाची बॅट गेल्या आयपीएलमध्ये शांत होती आणि त्यानंतर टीम इंडियाकडून खेळतानाही शॉ अपयशी ठरला आणि तो संघाबाहेर पडला. पण आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यात शॉने आपली खेळाची लेव्हल दाखवून दिली.


पृथ्वी शॉने चेन्नई सुपर किंग्जच्या कोणत्याही गोलंदाजाला सोडले नाही. दीपक चहरला षटकार मारत शॉने आपली पहिली बाऊंड्री ठोकली. शॉच्या या शॉटवरून लक्षात आले की तो आज मैदानावर काय करणार आहे. शॉने पाचव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या ओव्हरमध्ये सलग तीन चेंडूंमध्ये तीन चौकार ठोकले. पृथ्वी शॉच्या वादळी खेळीने दिल्ली कॅपिटलने धडाकेबाज सुरुवात केली. शिखर धवननेही त्याच्याबरोबर दमदार स्ट्रोक खेळले. दोघांनीही दिल्लीची धावसंख्या केवळ २८ चेंडूत ५० धावांवर नेली.


पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटलने ६५ धावा केल्या आणि पृथ्वी शॉने पाहता पाहता आपले आयपीएलमधील ७ वे अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतरही शॉने दमदार फलंदाजी सुरू ठेवली. शॉने केवळ ३८ चेंडूत ७२ धावा केल्या. शॉ १४ व्या षटकात ब्राव्होच्या चेंडूवर झेलबाद झाला. शॉने आपल्या डावात ९ चौकार आणि ३ षटकार लगावले आणि त्याचा स्ट्राइक रेट १९०च्या जवळपास होता.पृथ्वी शॉने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध ७२ धावांची खेळी खेळत आपल्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. स्वत: दिल्ली कॅपिटलचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनीही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात शॉच्या तंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, परंतु विजय हजारे ट्रॉफीमध्ये आणि आता आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यात शॉने केलेली फलंदाजी पाहून पॉंटिंगचे गैरसमज दूर झाले असावेत. 
 


संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply