Take a fresh look at your lifestyle.

शेळीपालन : जंत निर्मूलनाचे ‘हे’ मुद्दे माहित आहेत का; नसतील तर वाचा अन शेअरही करा

शेळ्यांच्या व्यवस्थापनात जंतनिर्मुलन हा घटक खूप महत्वाचा आहे. कारण, एकूण कराडांच्या वाढीसह आरोग्यासाठी हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. यामध्येही गाभण असलेल्या शेळ्यांना शेवटच्या महिन्यात जसे लसीकरण करू नये, त्याचप्रमाणे शेवटची चार महिने जंत निर्मूलनात अशा शेळ्यांना अजिबात सहभागी करून घेऊ नये. जर असे करण्याची खूप गरज वाटत असेल तर पशुवैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानेच जंताचे औषध द्यावे.

Advertisement

जंत निर्मूलनाचे मुद्दे असे :

Advertisement
  • शेळ्यांची पचनसंस्था सक्षम करण्यासह प्राण्यांचे आरोग्य सुधारून त्यांना सदृढ करण्यासाठी याची गरज असते.
  • कराडांना त्यांच्या जन्मानंतर २५ दिवसांनी आपण असे औषध देऊ शकतो.
  • जानेवारी आणि जुलै महिन्यात प्रतिकिलो वजनानुसार ०.५ मिली अल्बेंडाझॉल द्यावे. यामुळे चपटकृमी व गोलकृमी यांचे निर्मुलन होते.
  • एप्रिल व ऑक्टोबर या महिन्यात डीस्टोडीन / फॅसिनेक्स / झोनील / एवेलेथीन यापैकी कोणत्याही एका औषधाचा वापर करावा. पशुवैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानेच त्याचे प्रमाण लक्षात घेऊन ही औषधे द्यावीत.
  • बाह्य व अंतर परोपजीवी (उवा, गोचीड व पिसवा यांना प्रतिबंध करणारे) या दोन्हींच्या नियंत्रणासाठी क्लोझानटेल औषध तोंडावाटे द्यावे. तसेच यासाठीच इंजेक्शनद्वारे आयवरमेक्टिन हे १ मिली प्रति ५० किलो वजनानुसार द्यावे.

जंतनिर्मुलन करताना आपल्याच मनाने त्याचे डोस ठरवून शेळ्या, बोकड व कराडांना देऊन नयेत. त्यासाठी पशुवैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानेच नियोजन करावे. तसेच यासाठीचे एक ठोस वेळापत्रक तयार करून घ्यावे.

Advertisement

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

Advertisement

(क्रमशः)

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply