Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कॅश व्यवहार टाळा, कारण त्यावर सरकारचा ‘असा’ आहे डोळा..!

पुणे :

Advertisement

आर्थिक व्यवहार आजही तुम्ही कॅश (रोखीने) करीत असाल, तर आताच सावध व्हा. कारण, तुमच्या या व्यवहारावरही सरकारचा एक डोळा आहे. एखाद वेळी तुम्ही जाळ्यात अडकाल नि पस्तावाल.. तुमचा सर्व व्यवहार योग्य असेल, पारदर्शक असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. पण चौकशीचा ससेमिरा नाहक तुमच्या मागे लागू शकतो.. हे टाळायचे असेल, तर सगळे व्यवहार शक्यतो डिजिटल स्वरूपातच करा ना..

डिजिटल आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलते आहे. त्यादृष्टीने कमीत कमी व्यवहार रोखीने करण्यावर भर दिला जात आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी विविध माध्यमे सरकारने उपलब्ध करून दिली आहेत. हे व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत, यासाठी आर्थिक ट्रॅन्झॅक्शनचे नियम सातत्याने कठोर करण्यात येत आहेत.

तुमच्या घरात किती रोख रक्कम आहे, यासाठी काही निश्चित मर्यादा केलेली नाही. मात्र, घरातील रोख रकमेचा स्त्रोत तुम्हाला सांगावा लागेल. कॅश व्यवहार करण्यासाठी सरकारने काही नियम बनवले आहेत. चला तर मग हे नियम आज आपण जाणून घेऊ या..

कॅश (cash) व्यवहाराबाबतचे नियम
– व्यावसायिकानी १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख खर्च केल्यास, त्या रकमेला व्यावसायिक नफ्यात जोडण्यात येईल.
– तुम्हाला ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम फॉरेन एक्सचेंजमध्ये जाऊन घेता येणार नाहीत.
– दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी रोखीने करता येणार नाही.
– बॅंक खात्यातून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोखीने काढल्यास टीडीएस लागेल.

रोखीने केले जाणारे व्यवहार कमी व्हावेत, जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल स्वरुपात व्हावेत, यासाठी मागील काही वर्षात सरकार डिजिटल (digital) व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात पारदर्शकता वाढेल व नागरिकांना अधिक सुलभपणे आर्थिक व्यवहार करता येतील.

मागील काही वर्षात सरकारने काही धोरणेदेखील राबवली आहेत. त्याशिवाय देशातील डिजिटल व्यवहारांचे योग्य पद्धतीने नियमन करता यावे, आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकता वाढावी आणि डिजिटल व्यवहार अधिकाधिक सुरक्षित व्हावेत, त्यांची विश्वासार्हता वाढावी, यासाठी सरकारने अनेक नियम आणले आहेत. आधीचे नियमही कठोर केले आहेत.

डिजिटल व्यवहारांबाबत अर्थमंत्रालय (Finance Ministry) आणि रिझर्व्ह बॅंक (reserve bank of india RBI) सातत्याने पावले उचलत आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहारांपासून ते गुंतवणुकीपर्यत सर्व आर्थिक बाबी डिजिटल व्हाव्यात, यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी बॅंका आणि पेमेंट्स बॅंकांच्या व्यवहारांमध्ये अधिकाधिक सुरक्षितता आणण्यात येते आहे.

मोबाईलद्वारे व्यवहारावर भर
मोबाईलच्या (mobile) माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे सोपे झाल्याने सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. हे व्यवहार अधिक पारदर्शक, गतीमान आणि सुरक्षित होण्यासाठी रोखीने करण्यात येणाऱ्या व्यवहारांवर सरकारने अनेक बंधने घातली आहेत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply