Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो, २ हजार रुपये मिळाले नसतील तर करा की तक्रार; अशी आहे तक्रार

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना दर ३ महिन्यांनी २ हजार रुपये मिळतात. केंद्र सरकारने ८व्या हप्त्यातील २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank account) वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला मिळाला असेलच की.. नसेल मिळाला तर शांत बसू नका.. लगेच तक्रार करा.. कुठे करणार, कशी करणार, कधी करणार, याची माहिती नाही, तर मग ही बातमी वाचा की..!

शेतकऱ्यामागील शुक्लकाष्ट संपवावे, त्यांना अडचणीतून बाहेर काढावे, या हेतूने केंद्र सरकरने पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Scheme) सुरु केली. त्याद्वारे शेतकऱ्यांना दर ३ महिन्यांनी २ हजार रुपये सन्माननिधी देण्यास सुरुवात केली. अर्थात त्यातही भ्रष्टाचार झालाच.. अनेक अपात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ उठवला. ही बाब समोर आल्यावर मोदी सरकारने कायद्याचा बडगा उगारून त्याची वसुलीही केली.
तर असो. कोरोना संकटातही मोदी सरकारने आता ८ व्या हप्त्यातील २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यास सुरुवात केली आहे. पण अजून अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. मात्र ही रक्कम मिळाली नसल्यास शेतकऱ्यांना आता तक्रार करता येणार आहे.

अशी करा तक्रार..
बँक खात्यावर रक्कम आली नसल्याची खात्री करून घ्या.. रक्कम आली नसल्यास आपल्या क्षेत्रातील लेखापाल व कृषी अधिकारी (Agriculture Department Officer) यांच्याकडे संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती द्या. ते जर एकूण घेत नसतील तर, तुम्ही हेल्पलाइनवरही (01123381092) तुमची तक्रार करू शकता. तसेच, सोमवार ते शुक्रवार दरम्यान कधीही पीएम किसान हेल्प डेस्कच्या ई-मेलवर (pmkisanict@gmail.com) संपर्क करू शकता. तुमच्या तक्रारीची दखल त्यांना घ्यावीच लागेल.

अधिकाऱ्याची तक्रार करा.!
मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना २ हजार (Rs. 2000/-) रुपये मिळाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. एखाद्या गावातील सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत. तर काही ठिकाणी कोणालाच मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही लोकांना पहिला हप्ता मिळाला, नंतर काहीच मिळाले नाही. असे झाले असेल तर, आधी लेखापाल व कृषी अधिकाऱ्यांना विचारा.

लाभार्थींच्या यादीत आपले नाव आहे का, हे तपासा. यादीत नाव असेल तर मग तुम्ही निश्चित त्याची तक्रार करू शकता. काही अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत असतील, तर त्यांची तक्रार करा. संबंधित अधिकाऱ्यावर नक्कीच कारवाई होईल..!

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply