Take a fresh look at your lifestyle.

बचत ठेवीपेक्षा ‘इथे’ मिळतो अधिक परतावा; ‘या’ योजनांबाबत जाणून घ्या माहिती

आयुष्यातील उतार वय म्हणजे गळणारे पान.. कधी गळून पडेल, त्याचा काय भरवसा..? जीवनातील सगळ्यात हलाखीचा, लाचारीचा काळ.. त्यातही या वयात गाठीशी पैसे नसतील, तर आयुष्याची फरफट ठरलेली. त्यामुळेच अनेक जण या उतार वयासाठी काही तरी पुंजी (Rupees / Money) राखून ठेवतात..

Advertisement

आतापर्यंत नागरिक बँका (bank) वा पतसंस्थेत बचत (savings) ठेवीच्या (Fixed Deposit) स्वरूपात काही रक्कम ठेवत. त्याशिवाय पर्यायही नव्हता. मात्र, आता त्यातूनही जास्त व्याज (Loans and savings interest) मिळत नाही. मग करणार काय, असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर काळजी करू नका. कारण, आता तुम्हाला FD पेक्षाही अधिक पैसे मिळवून देणाऱ्या योजना बाजारात उपलब्ध आहेत. चला तर मग, तुम्हाला मालामाल करणाऱ्या या योजनांबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अर्थात NSC. पोस्ट खात्याकडून चालवली जाणारी योजना. या योजनेत मिळणारा व्याजदर FD पेक्षा जास्त, म्हणजेच जवळपास 6.8 टक्के आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक करु शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी (Inestments) कोणतीही मर्यादा नाही. मुलांच्या नावावरही ही योजना सुरु करु शकता. शिवाय त्यात जॉईंट अकाउंटदेखील काढता येईल. कर कायद्यानुसार दीड लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलतही मिळते.

Advertisement

किसान विकास पत्र (KVP)
पोस्ट खात्याचीच आणखी एक लोकप्रिय योजना, म्हणजे ‘किसान विकास पत्र’ (Kisan Vikas Patra). त्यात गुंतवणुकदाराला 6.9 टक्के व्याजदर मिळतो. मात्र, त्यासाठी तुम्ही प्रौढ, म्हणजेच कमीत कमी 18 वर्षे वयाचे असणं आवश्यक आहे. या योजनेतही एकाच्या वा दोघांच्या नावे गुंतवणूक करता येते. मुलांच्या नावे खातं सुरु करता येईल; पण मुलांच्या वतीने पालकच व्यवहार करु शकतात. तुम्ही अडीच वर्षांनंतर कधीही आपले पैसे परत घेऊ शकता. या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये गुंतवणूक करता येते.

मंथली इन्कम स्कीम (MIS)
मंथली इन्कम (Income) स्कीमही पोस्ट (India Post) विभागाचीच आहे. त्यात गुंतवणुकीवर 6.6 टक्के व्याज मिळते. योजनेत कमीत कमी एक हजार रुपये भरुन खातं सुरु करता येतं. एकट्याचं खातं असेल, तर तुम्ही 4.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. दोघांत खातं असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. ही योजना पूर्ण होऊन परतावा मिळण्यासाठीचा कालावधी 5 वर्षे आहे.

Advertisement

टाईम डिपॉजिट स्कीम (Time Deposit Scheme)
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉजिट स्कीम, म्हणजे एकप्रकारे FD सारखीच आहे. त्यात विशिष्ट काळासाठी एकरकमी गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर गुंतवणुकदाराला निश्चित व्याजदराने परतावा मिळतो. ही गुंतवणूक 1 ते 5 वर्षांसाठी असेल, तर गुंतवणुकीवर 5.5 ते 6.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. शिवाय कर सवलतही मिळते. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमीतकमी वयाची अट 18 वर्षे आहे. या योजनेत कमीतकमी 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply