Take a fresh look at your lifestyle.

द्रविडचा राग पाहून सगळेच आश्चर्यचकित; पहा त्यावर विराट कोहली ‘..असं रुप कधीच पाहिलं नाही’ असं का म्हणाला..!

पुणे :

Advertisement

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ‘वॉल’ या नावाने लोकप्रिय असलेल्या राहुल द्रविडचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. क्रिकेटच्या मैदानावर शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा राहुल रस्त्यावर भांडण आणि गुंडागिरी करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना पहिले अजिबात खात्री पटली नाही की हा द्रविडच आहे म्हणून. यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीचाही समावेश असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विराटने म्हटले आहे की, राहुल भाईचे असे रूप त्याने कधीच पाहिले नाही.

Advertisement

आता तुम्ही याबद्दल अधिक सिरीयसली विचार करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी आम्ही हे सांगू इच्छितो की हा वास्तविकतेचा भाग नाही तर जाहिरातीचा भाग आहे. विराटसह सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांनी राहुल द्रविडचा हा व्हिडिओ खूप लाईक करत शेअरही केला आहे. व्हिडिओमध्ये द्रविड गुंडागर्दी तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या अन्य वाहनांचे नुकसान करीत आहे. याशिवाय तो इतर वाहनांचे साईड मिरर तोडत आहे, तसेच लोकांशी भांडतही आहे. हा एका जाहिरातीचा भाग आहे.

Advertisement

राहुल द्रविडने आपल्या कारकीर्दीत १६४ कसोटी सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने १३ हजार २८८ धावा केल्या आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या २७० धावा असून कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३६ शतके आणि ६३ अर्धशतके झळकावली आहेत. राहुल द्रविडने वनडेमध्ये ३४४ सामने खेळले असून यामध्ये त्याने १० हजार ८८९ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या या प्रकारातील त्याची सर्वोत्तम धावसंख्या १३३ आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने १२ शतके आणि ८३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने फक्त १ आंतरराष्ट्रीय टी २० सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याने ३१ धावा केल्या आहेत. दरम्यान, द्रविड कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व १० संघांविरुद्ध शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. 

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply