Take a fresh look at your lifestyle.

म्हणून हार्दिक पांड्याने गोलंदाजी करणे टाळले; पहा नेमके काय आहे कारण

मुंबई :

Advertisement

आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्यात स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या अनफिट  दिसला. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान तो क्षेत्ररक्षण करताना चेंडू नीट फेकू शकला नाही. हार्दिक पांड्याच्या खांद्याला दुखापत झाली असून तो हाताखालून चेंडू फेकताना दिसला. 

Advertisement

आरसीबीच्या फलंदाजीदरम्यान असे दोनद घडले की तो चेंडू थ्रो करू शकला नाही. यामुळे विराट कोहलीला जीवदानही मिळाले. दुसर्‍या प्रसंगात विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने तीन धावा चोरल्या. या दोन्ही घटना सलग दोन षटकांत घडल्या. त्याने या सामन्यातही गोलंदाजी केली नाही. 2019 मध्ये दुखापत झाल्यापासून हार्दिक आता गोलंदाजी करणे टाळतो.

Advertisement

पहिली घटना  सातव्या ओवरमध्ये पहिल्याच चेंडूवर घडली. क्रुणाल पंड्याच्या चेंडूवर विराट कोहलीने चेंडू डिफेंड केला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला पण ग्लेन मॅक्सवेलने नकार दिला. चेंडू हार्दिक पांड्याने पकडला आणि फेकण्याचा प्रयत्न केला, कोहलीने विकेट वाचेल ही आशाच सोडली होती पण हार्दीकला नेहमीप्रमाणे जलद गतीने चेंडू फेकता आला नाही आणि आरसीबीचा कर्णधार आरामात क्रीजवर पोहोचला. मुंबईने विराटच्या विकेटची संधी गमावली. त्यानंतर ३३ धावांची खेळी करून तो बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला बाद केले.  

Advertisement

आरसीबीच्या डावाच्या आठव्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे पुन्हा दिसून आले. राहुल चहरच्या चेंडूवर कोहलीने स्लिप आणि शॉर्ट थर्ड मॅन दरम्यान शॉट मारला. चेंडू हार्दिककडे गेला आणि तो चेंडू वेळेवर फेकू शकला नाही. त्याने रोहितकडे अंडर आर्मने चेंडू फेकला आणि मग तेथून किपरकडे चेंडू आला. याचा फायदा घेत कोहलीने तीन धावा केल्या. या सामन्यात हार्दिक पांड्याने फलंदाजीही केली नाही.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply