Take a fresh look at your lifestyle.

आणि आरसीबीच्या हर्षल पटेलने ‘तो’ही इतिहास रचला..!

मुंबई :

Advertisement

यंदाच्या मोसमातील आयपीलच्या पहिल्याच सामन्यात हर्षल पटेल हॅटट्रिक घेण्यात चुकला, परंतु त्याच्या पाच विकेटमुळे शुक्रवारी मुंबई इंडियन्सला पराभूत करण्यात मोठा वाटा उचलला. या सामन्यात मुंबईला १५९ धावा करता आल्या. पटेलने चार षटकांत २७  धावा देऊन पाच विकेट घेतल्या. त्याची ही कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. दरम्यान, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेल्यामुळे लढत रंगतदार झाली.

Advertisement

मुंबईविरुद्ध कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. त्याच्याशिवाय मोहम्मद सिराज (चार षटके 22 धावा) आणि काईल जेम्सन (27 धावांत 1 विकेट) यांनीही चांगली गोलंदाजी केली. पटेलनेही 5 विकेट्ससह एक विशेष विक्रम केला. आयपीएलच्या इतिहासात हर्षल पटेल मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 बळी घेणारा एकमेव गोलंदाज ठरला आहे. हार्दिकने पंड्या,  ईशान किशन,  क्रुणाल पंड्या, कैरान पोलार्ड आणि मार्को जेन्सन या फलंदाजांना बाद करून 5 बळी मिळविले.

Advertisement

आयपीएलच्या लिलावात हर्षलला आरसीबीने 20 लाख रुपयांत विकत घेतलं होतं आणि त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. मुंबईकडून सलामीवीर ख्रिस लिन ( ३५ चेंडूत ५९ रन्स) आणि सूर्यकुमार यादव ( २३ चेंडूंत ३१ रन्स) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७०  धावांची भागीदारी करून मुंबईला मोठ्या धावसंख्येवर नेले. त्यानंतर क्षेत्ररक्षकांची मदत मिळाल्यामुळे आरसीबी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना दबावात आणले. शेवटच्या चार षटकांत केवळ २५  धावा केल्या. पटेलने डावाच्या शेवटच्या षटकात केवळ एक धाव दिली आणि तीन गडी बाद केले.  

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply