Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ घोटाळ्यातही वाझेचा हात; पहा नेमके कोणाकडून घेतले होते 30 लाख..!

मुंबई :

Advertisement

अँटिलिया या सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोरील कारमध्ये स्फोटके ठेवण्यासह मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर निलंबित पोलिस उपनिरिक्षक सचिन वाझेचा (Mumbai Police & Sachin Vaze) आणखी एक कारनामा पुढे आलेला आहे. देशभरात टेलिव्हिजन सेक्टरला झटका देणाऱ्या TRP घोटाळ्यातही वाझे याचा थेट हात असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावनी संचालनालया (ED)ला टीआरपी घोटाळा आणि वाझेमध्ये संबंध असल्याचे काही पुरावे मिळायची बातमी येत आहे. ब्रॉडकास्टिंग ऑडियंस रिसर्च काउंसिल (BARC)च्या अधिकाऱ्यांना त्रास न घेण्यासाठी 30 लाख रुपये घेतले असल्याची कबुली वाझेने दिली आहे. एकूणच वाझे याचे हात अनेक प्रकरणात थेट असल्याचे पुढे येत आहे.

Advertisement

BARC आणि फेक TRP प्रकरणाशी संबंधित लोकांना दक्षिण मुंबईतील पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावून घेत तासनतास थांबवले जायचे. अशावेळी नको ती डोकेदुखी म्हणून पोलिसांना पैसे देण्याचे प्रकार मग आरोपातील व्यक्ती करीत असतात. त्याच पद्धतीने वाझेने या अधिकारी आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांकडून तब्बल 30 लाख रुपये वसूल केल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी आणखी काही चौकशी बाकी असून मगच यातले वास्तव आणखी जगजाहीर होणार आहे.

Advertisement

TRP प्रकरणात ED ने फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि महामूवीज चॅनेलची 32 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त केली आहे. महामूवी आणि बॉक्स सिनेमाने मुंबईमध्ये आपली 25% TRP फक्त 5 घरांमध्ये लागलेल्या बॅरोमीटरद्वारे मिळवली होती. तर, फक्त मराठीनेदेखील अशाच प्रकारे 5 घरांमधून 12% TRP मिळवली होती. एकूणच या प्रकारातून न्यूज आणि मनोरंजन वाहिन्यांचा घोटाळा जगजाहीर झाला होता. मात्र, त्यातही पोलिसांनी काहीतरी वेगळी मेख मारल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. आता त्यावर पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन :सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply