Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल 2021 : म्हणून वीरेंद्र सेहवाग झाला एबी डिव्हिलियर्सच्या फलंदाजीचा चाहता..!

मुंबई :

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगच्या १४  व्या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मुंबई इंडियन्सचा २  गडी राखून पराभव केला. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात आरसीबीने एबी डिव्हिलियर्सच्या २७  चेंडूतील ४८  धावांच्या खेळीमुळे विजयासह स्पर्धेस सुरुवात केली. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ख्रिस लिनच्या ४९ धावांच्या डावामुळे मुंबई संघाने २० षटकांत ९  गडी गमावून १५९  धावा केल्या.

Advertisement

(1) Virender Sehwag on Twitter: “Will power = De villiers Power. Defeats all power. No wonder the @IPL logo is secretly designed after @ABdeVilliers17 . Champion knock. But Patel Bhai ke raaz mein , RCB bowling mazaa aaya. Top spell 5/27. Is saal cup aande , no vaandey. #RCBvsMI https://t.co/NcPBRzaRrd” / Twitter 

Advertisement

आरसीबीकडून हर्षल पटेलने पाच गडी बाद केले. डिव्हिलियर्स आणि हर्षल पटेल यांच्या कामगिरीचे भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने कौतुक केले आहे. वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटरवर लिहिले की, ‘विल पॉवर = डिव्हिलियर्स पॉवर. सर्व शक्तींचा पराभव केला. एबी डीव्हिलियर्स नंतर आयपीएलचा लोगो गुप्तपणे तयार केला गेला आहे यात मला अजिबात आश्चर्य नाही. चॅम्पियन खेळी. पटेल भाईंच्या गोलंदाजीचेही त्याने कौतुक केले.

Advertisement

आरसीबीकडून मुंबईविरुद्ध पाच विकेट घेणारा हर्षल पटेल पहिला गोलंदाज आहे. त्याने ईशान किशन, हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या यासारख्या मोठ्या विकेट्स आपल्या नावावर केल्या. विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबी सामना हरेल असे वाटत होते, पण डिव्हिलियर्सने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. एबीने आपल्या वादळी खेळीदरम्यान ४ चौकार आणि २  षटकार लगावले. तथापि, शेवटच्या षटकात डिव्हिलियर्सच्या विकेटमुळे सामना पुन्हा एकदा अडकला,  परंतु हर्षल पटेलने अखेरच्या दोन चेंडूत संघाला विजय मिळवून दिला.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply