Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : म्हणून अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली; पहा कधी होणार परीक्षा..!

मुंबई :

Advertisement

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांना पत्र लिहून मागणी केल्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 11 एप्रिलला होऊ घातलेली परीक्षा पुढे ढकलली आहे. मात्र, नवीन तारीख जाहीर केलेली नाही. नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.

Advertisement

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत म्हटले आहे की, मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल. तुमच्यातील ज्या संवेदना आज जिवंत आहेत त्या परत एकदा महाराष्ट्राला दिसल्या. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने आपण MPSC आणि MBBS च्या ज्या परीक्षा पुढे ढकलल्या त्याबद्दल आपले जाहीर आभार!

Advertisement

Dr.Jitendra Awhad on Twitter: “मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल. तुमच्यातील ज्या संवेदना आज जिवंत आहेत त्या परत एकदा महाराष्ट्राला दिसल्या. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने आपण MPSC आणि MBBS च्या ज्या परीक्षा पुढे ढकलल्या त्याबद्दल आपले जाहीर आभार! #mpscexam https://t.co/tkNjFY4Ajm” / Twitter

Advertisement

आठवड्याभरापासून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष रस्त्यावर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता परीक्षार्थींच्या सुरक्षेसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास बोलावलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply