Take a fresh look at your lifestyle.

पडळकरांना मिटकरी यांनी हाणला टोला; पहा MPSC परीक्षेबाबत काय म्हटलेय त्यांनी

पुणे :

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या मुद्द्यावरही आता राजकारणाने वेग घेतला आहे. सध्या वाढते करोना रुग्ण आणि लसीकरण या मुद्द्यासह स्पर्धा परीक्षा आता घ्याव्यात किंवा नाही, हाही कळीचा मुद्दा बनला आहे. मागील महिन्यात याच मुद्द्यावर राज्यातील विरोधी पक्ष आणि विद्यार्थी अडून बसले होते. आता तेच परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करताना दिसत आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला फटकारले आहे.

Advertisement

मिटकरी यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आडव्या झोपण्याच्या किस्स्याची आठवण काढून म्हटले आहे की, परिक्षा पुढे ढकला म्हणुन सर्व विद्यार्थ्यांनी आग्रह धरलाय.मागील काळात काही हौसी आंदोलनजीवी रस्त्यावर झोपले होते, त्यानंतर MPSC ची तयारी करणाऱ्या 2 गरीब विद्यार्थ्यांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या उतावीळ नेत्यांनी आता तरी आडवे येऊ नये.

Advertisement

त्यावर विकास महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, आमदार साहेब त्यावेळी कोरोणा कमी प्रमाणात होता त्यावेळी सरकारने त्याM P S C मुलांचा विचार नाही केला मग हा संसर्गजन्य रोग आहे याला काय ती M P S Cमुलं जबाबदार आहेत का?परीक्षा घेऊन नंतर आणी सरकार म्हणाय रिकामं कि संसर्गजन्य रोग वाढला कोणामुळे. कि या मुलांमुळेच वाढला क्या बात है..!

Advertisement

तर, राहुल पवार यांनी म्हटलेय की, मिटकरी साहेब कोणत्या विद्यार्थ्यांनी आग्रह धरलाय सांगता का?… आणि ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा झालीच पाहिजे असा आग्रह धरला त्यांच्याबद्दल पण ट्विट करा… नुसत राजकारण नका करू… तर, महेश खारतोडे पाटील यांनी लिहिले आहे की, परीक्षा पुढे ढकला म्हणून अगदी थोड्या मूलांनी आग्रह धरला आहे सर्व नाही, पुर्ण महाराष्ट्रातल्या मुलांचा विचार करा, परीक्षा आहे त्यावेळीच (11 एप्रिल रोजी) झालीच पाहिजे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी  

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply