Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ दुर्दैवी घटनेत फायर ब्लोअरचाही झाला होता स्फोट; मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल

मुंबई :

Advertisement

गोंदिया जिल्ह्याच्या नागझरी अभयारण्य आणि पिटेझरी वन परिक्षेत्रातील आगीच्या दुर्दैवी घटनेत तीन वन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर, दोघेजण गंभीर जखमी आहेत. ही आग विझवताना पुरेशी संसाधने उपलब्ध नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच एका फायर ब्लोअरचा स्फोट झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलेले आहे. याप्रकरणी मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत जाहीर केली आहे.

Advertisement

CMO Maharashtra on Twitter: “नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल लागलेल्या आगीतील दुर्दैवी मृत मजुरांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. आगीत जखमी वनमजुरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार आहे.” / Twitter

Advertisement

लोकमत या वृत्तपत्रानेही आपल्या बातमीत ब्लोअर यंत्राचा स्फोट झाल्याचा उल्लेख केलेला आहे. एकूणच राज्यभरातील आग विझवण्यासाठी वन विभागातर्फे वापरण्यात येत असलेल्या उपकरण आणि त्यासाठी अधिकारी स्तरावरून होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा यानिमित्ताने अधोरेखित झालेला आहे. येथील आगीच्या घटनेत तिघेजण मजूर मृत्युमुखी पडलेले आहेत. आग चोहोबाजूंनी फोफावले आणि त्यात ते अडकल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच या ठिकाणी पुरेशी संसाधने उपलब्ध नसल्याचा मुद्दाही पुढे आलेला आहे. त्याकडेही मुख्यमंत्री लक्ष देतील असे अनेकांना वाटत आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने याबाबत ट्विटरवर लिहिले आहे की, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल लागलेल्या आगीतील दुर्दैवी मृत मजुरांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. आगीत जखमी वनमजुरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply