Take a fresh look at your lifestyle.

तर आणखी संपूर्ण लॉकडाऊन; पहा नेमके काय म्हटलेय मंत्री वडेट्टीवार यांनी

मुंबई :

Advertisement

राज्यभरात करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढीचा वेग भयंकर असतानाच मिनी लॉकडाऊनला विरोध होत आहे. त्यावर राज्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना अशा कडक निर्बंधांची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जर रुग्णसंख्या आणखी वाढली तर संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा लागेल असे म्हटलेले आहे.

Advertisement

TV9 Marathi on Twitter: “LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/13MjgVgXeb” / Twitter

Advertisement

त्यांनी मांडलेले मुद्दे असे :

Advertisement
  • रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे हा आकडा पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात १० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीत भविष्यात पूर्णच लॉकडाऊन करावा लागेल.
  • परिस्थिती हाताळण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. त्यामुळे वीकेण्ड नाही तर मी मुख्यमंत्र्यांना तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्यास सांगणार आहोत.
  •  निरपराध लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पूर्णत: लॉकडाउनची आवश्यकता असून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे.
  • रुग्णसंख्या वाढल्यास डॉक्टर, नर्सेस कमी पडतील. साडे पाच हजार डॉक्टर जे आता अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना ठिकठिकाणी कामाला लावत होतो, तरीदेखील मनुष्यबळ कमी पडत आहे. 
  • एमपीएससची परीक्षा रद्द केली तेव्हा भाजपा रस्यावर उतरला, त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या अडीच लाख मुलांना करोना झाला आहे. यामुळे परीक्षा रद्द करा अशी मागणी आता होत आहे.

संपादन : विनोद सूर्यवंशी  

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply