Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात मालामाल बंपर ग्रोथ देणाऱ्या कंपन्यांची यादी; दहाच वर्षात लाखाचे झाले ‘इतके’ पैसे..!

शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना (inverters) झटका दिला आहे, तर काहींनी मालामाल केले आहे. आज आपण अशाच काही महत्वाच्या कंपन्यांनी मागील दहा वर्षात इन्व्हेस्टर मंडळींना कशी बंपर ग्रोथ दिली याची माहिती पाहणार आहोत. आपणही ही माहिती वाचावी आणि शेअर बाजारात अफवा व टिप्स (trading tips) यांच्यावर अजिबात भरोसा न ठेवता अभ्यासपूर्ण पद्धतीने गुंतवणूक करावी.

Advertisement

अनेकांचे मत आहे की शेअर बाजार (Indian Share Market BSE / NSE) तेजीत असताना काहींचे पैसे बुडणार आहेत. पण प्रत्यक्षात तसे नाही. जर एखाद्याने चांगल्या कंपनीमध्ये बराच काळ गुंतवणूक केली असेल तर त्याला खूप चांगले उत्पन्न मिळते. अशा शेकडो कंपन्या आहेत ज्यांनी चांगले उत्पन्न दिले आहे. अनेक कंपन्यांनी 10 वर्षात 1000 % यापेक्षा जास्त परतावा दिला आहे. बजाज फायनांस (Bajaj Finance) या कंपनीने 10 वर्षात तब्बल 16,000 टक्के परतावा दिला आहे. या मोठ्या कंपन्या आहेत. ज्यात गुंतवणूक सामान्यत: सुरक्षित मानली जाते. 1000 टक्के परतावा म्हणजे 1 लाख रुपये 10 लाख रुपये होतात.

Advertisement

आयशर मोटर्सच्या (eicher motors share)  गुंतवणूकदारांनाही चांगला फायदा झाला आहे. या कंपनीने गेल्या 10 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. या कंपनीने गेल्या 10 वर्षात सुमारे 4000 टक्के परतावा दिला आहे. आयशर मोटर्सचे शेअर्स 2009 मध्ये सुमारे 400 रुपये होता. स्प्लिट झाल्यावर हा शेअर सध्या 2521 रुपयांना आहे. ही कंपनी सुप्रसिद्ध बुलेट मोटारसायकल बनवते.

Advertisement

चांगला परतावा देणारा आणखी एक स्टॉक म्हणजे बजाज फिनसर्व्ह. बजाज फिनसर्व्हरने (Bajaj Finserv Ltd) सुमारे 2400 टक्के परतावा दिला आहे. 2009 मध्ये कंपनीचा शेअर सुमारे 280 रुपये होता, जो आता 96५६ रुपये झाला आहे. तर, फेविकॉल ब्रांडच्या पिडलाईट इंडस्ट्रीजने 1800 % परतावा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, पिडलाईट इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर आहे.

Advertisement

घड्याळे आणि सोन्याचे व्यापार करणार्‍या टायटन (Titan) या कंपनीनेही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. टायटनने गेल्या 10 वर्षात सुमारे 1700 टक्के परतावा दिला आहे. 1000 टक्क्यांहून अधिक रिटर्न (Investment Return) देणाऱ्या कंपन्यांमध्ये ब्रिटानिया (Britannia) इंडस्ट्रीजचेही नाव आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. गेल्या 10 वर्षांत ब्रिटानियामध्ये गुंतवणूक केलेले उत्पन्न सुमारे 1400 टक्के वाढले आहे. इंडसइंड बँकेनेही (Induind Bank) गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या 10 वर्षात त्यामध्ये सुमारे 1350 टक्के परतावा मिळाला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply