Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या ‘या’ आहेत महत्वाच्या टिप्स; पहा नेमके काय करावे आणि काय करू नये..

शेअर बाजारात (share market bse & nse) कमी कष्टात लैच पैसे (money) झटपट मिळत असल्याचे अनेकांना वाटते. जुगारावर पैसे लावल्यागत यामध्ये काहीजण लावतात. मात्र, या शेअर बाजारात जुगार हा प्रकार नसतो. कंपनीवर विश्वास आणि बाजाराची दिशा या दोन्ही बाजूंचा विचार करून येथे गुंतवणूक (investment) केली तरच पैसे मिळतात. नाहीतर, आपल्याला पैसे येतात म्हणजे कोणाचेतरी जातात हे साधे गणित आहेच की. त्याच पद्धतीने पैसे जाणे-येणे हा नियम लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण पद्धतीने यात गुंतवणूक करणाऱ्यांना भविष्य आहे. नाहीतर अफवा आणि टिप्स (trading tips) यांच्या भरोश्यावर राहून पैसे गेलेच म्हणून समजा.

Advertisement

शेअर बाजाराच्या गुंतवणूकीसाठी मन शांत आणि योग्य दिशा लक्षात घेऊन पावले उचलावी लागतात. येथे एक मोठी जोखीम आहे. परंतु, बाजाराचे आडाखे जुळले तर आपल्याला इतर कोठूनही शेअर बाजाराइतके चांगले उत्पन्न मिळू शकत नाही. शेअर बाजार अशी जागा आहे जिथे आपण लहान रकमेसह गुंतवणूक करू शकतो. अगदी खाते खोलून आपण आपल्या खिशात किंवा बँक खात्यात (bank) जितके पैसे असतील त्यानुसार पैसे लावू शकतो. कर्ज (loans) काढून हा खेळ करायचा नसतो.

Advertisement

इथे 1 रुपयापासून 1 लाखापर्यंत शेअर असतात. त्यातले आपल्या आवाक्यातील आणि चांगले रिटर्न देऊ शकणारे शेअर घेऊन आपण पैसे कमवू शकतो. त्यासाठी फक्त यासाठी आपल्याकडे चांगले शेअर्स असले पाहिजेत. बोगस कंपन्यांच्या (शेल कंपन्या) शेअरमध्ये गुंतला आणि जास्त रिटर्न मिळण्याची हाव ठेवली की इथे बट्ट्याबोळ झालाच म्हणून समजा.

Advertisement

जगातील सर्वात मोठ्या आणि नामांकित गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजार एक उत्तम व्यासपीठ असल्याचे सिद्ध झाले आहे. जागतिक स्तरावर राकेश झुंझुनवाला (rakesh jhunjhunwala) आणि वॉरेन बफे (warren Bufet) सारख्या यशस्वी शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांनी यशाचे एक उदाहरण समोर ठेवले आहे. मग आपण त्यांना फॉलो करायला जायचे असते असे नाही. ते जसे आपला निर्णय अभ्यास करून घेतात, तसाच आपणही अभ्यास (education and study) करून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

Advertisement

(भाग 1)

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply