Take a fresh look at your lifestyle.

‘अजितदादांचा आहे ‘त्यावर’च डोळा.. राज्यात सत्ताबदल होणार..’; भाजपने केला गंभीर आरोप

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान देण्यासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. इथे पंचरंगी लढतीत नेमका कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान,  भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Advertisement

पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ कचरेवाडी येथील सभेत बोलताना शिंदे यांनी म्हटले आहे की, पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचा जगदंबा कारखाना ताब्यात घेतला आहे. करमाळ्यातील आदिनाथही त्याच्याच ताब्यात आहे. आता त्यांची नजर विठ्ठल कारखान्यावर आहे. त्या कारखान्यावर डोळा ठेऊन त्यांचे राजकारण चालू आहे.

Advertisement

पुढे शिंदे यांनी म्हटले आहे की, पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यास उशीर झाला. कारण त्यांना त्यांचा मुलगा पार्थ पवार यांना उमेदवारी द्यायची होती. मात्र ते काही जमले नाही. शेवटी विठ्ठल कारखाना अवसायनात काढून आपल्या ताब्यात घ्यायचा त्यांचा डाव आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक फ़क़्त सहानुभूती या मुद्द्यावर लढवत आहे. त्यांच्याकडे कोणतेही कर्तृत्व नाही ना विकासाचे मुद्देही. सध्या रोज एक मंत्री घरी जात असून भ्रष्टाचारात नवी नावे समोर येत असल्याने या सत्तेला सुरुंग लागला आहे. काउंटडाऊन सुरू झाले असून पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ताबदल निश्चित असल्याचे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हटले आहे.

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply