Take a fresh look at your lifestyle.

टॉमेटोवर व्यवस्थापन : फळ पोखरणाऱ्या अळीचे असे करा नियंत्रण

पुणे :

Advertisement

सध्या राज्यातील अनेक भागात टॉमेटो या फळभाजी पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या अळीचे वेळीच नियंत्रण केले नाही तर उत्पादक शेतकऱ्यांचे टोमॅटो पिकाचे ३० टक्यापर्यंत नुकसान होते.  टोमॅटो पिकाशिवाय हरभरा पिकात असल्यास तिला घाटे अळी म्हणतात. ही अळी कापूस पिकात बोंडाचे नुकसान करते. या अळीचा उद्रेक पाने, फुले, फळे, इ. पिकांच्या भागावर होतो. हे कीड उष्ण उपोष्ण आणि सम हवामानात ही आढळते.

Advertisement

याबाबत डॉ. अंकुश चोरमुले (कृषी कीटक शास्त्रज्ञ, आष्टा) यांनी म्हटले आहे की, टोमॅटोवर बऱ्याच ठिकाणी फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ढगाळ वातावरण यासाठी कारणीभूत आहे. अळीच्या व्यवस्थापनासाठी खालील पैकी एका कीटकनाशकाचा वापर करावा : इंडोक्झाकार्ब (Avant) (१४.५ एससी) ०.८ मिली / फ्लुबेंडिअमाईड (टाकुमी)(२० डब्लूजी) ०.५ ग्रॅम / नोव्हॅल्युरॉन (rimon) (१० ईसी) ०.७५ मिली / क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (कोराजन) (१८.५ एससी) ०.३ मिली.

Advertisement

बायलाॅजिकल उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारित ॲझाडिरेक्टीन (३००० पीपीएम) २ मि.लि प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी. बी. टी. जिवाणूजन्य किटकनाशक २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात करावी, असेही चोरमुले यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

इतर उपाय आणि माहिती पुढीलप्रमाणे :

Advertisement

लागवड करताना मुख्य पिकाच्या कडेने मका व चवळी लागवड करावी. तसेच झेंडूची लागवड केली तरी फायद्याचे ठरते. लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चीलोनिस हे मित्र कीटक १ लाख प्रती हेक्टारी या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा सोडा. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात परिणामी फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होतात. शेतात एकरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावावे. किडलेली फळे काढून खोल खड्डयात गाडून टाकावीत.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply