Take a fresh look at your lifestyle.

तरच वापरा रेमडेसिवीर; वाचा शास्त्रीयदृष्ट्या महत्वाची माहिती

सध्या राज्यात करोना (corona / covid 19) लस पुरवठ्याचे राजकारण जोमात आहे. राज्याला लोकसंख्या आणि रुग्णसंख्या यांच्या तुलनेत कमी प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर, राज्याला मुबलक पुरवठा केल्याचा दावा राज्यात विरोधी पक्ष आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने केला आहे. त्याचवेळी अनेक भागात  रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पहा की हे इंजेक्शन नेमके आहे कशासाठी आणि कधी याचा वापर करावा याची माहिती.

Advertisement

म्हणून निर्माण झाला आहे रेमडेसिवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) तुटवडा :

Advertisement
 • हे प्रायोगिक औषध असून, असे असले तरी खासगी रूग्णालयात सर्रास १०० टक्के रूग्णांना हे इंजेक्शन वापरले जात असल्याचे म्हटले जात आहे.
 • परिणामी रूग्णांना पोस्ट कोविडबरोबर रेमडेसिवीरच्या दुष्परिणामाने धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या टास्क फोर्स समितीने रेमडेसिवीरचा गैरवाजवी वापर थांबविण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
 • खासगी रुग्णालयात १०० टक्के रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात असल्याचे शासनाच्या पाहणीतून समोर आले आहे. परिणामी तुटवडा निर्माण झाला आहे.
 • सरकारी कोविड रूग्णालयात रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध आहे. खासगी औषध विक्रेत्यांकडे इंजेक्शन नसल्याने त्यांना सरकारी रूग्णालयातून लोन बेसेसवर पुरवठा केला जात होता. आता खासगी विक्रेत्यांनाही इंजेक्शन उपलब्ध केलेले आहे. गरज नसताना काही रूग्णालयात रेमडेसिवीरचा वापर होत असून, हे धेाकादायक आहे.
 • शासनाने केलेल्या पाहणीत बहुतांश खासगी रूग्णालये १०० टक्के रूग्णांसाठी या इंजेक्शनचा वापर करत आहेत. मात्र सरकारी रूग्णालयात हे प्रमाण ३० टक्के इतके आहे.

या इंजेक्शनबाबतचे महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
 • रेमडीसिवीर हे इंजेक्शन तूर्त तरी प्रायोगिक औषध असून, काही देशांनी या इंजेक्शनचा वापरच थांबवला आहे. रूग्णांनी तसेच नातेवाइकांनी गरज नसताना रेमडीिसवीरच्या वापराबाबत आट्टाहास धरू नये.
 • रेमडीसिवीर देण्यापूर्वी यकृताच्या (लिव्हर) दैनंदिन तपासण्या करणे आवश्यक आहे.तशा मार्गदर्शक सूचना आहेत. तपासण्या न झाल्यास यकृताला धेाका निर्माण होऊ शकतो.
 • रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावली आणि न्यूमोनिया अति प्रमाणात वाढला तरच रेमडेसिवीरचा वापर करावा.
 • न्युमोनियाचे प्रमाण वाढलेले असल्यास मात्र ऑक्सिजन पातळी नियंत्रित असल्यास रेमडिसिवीरचा वापर गैर आहे. मात्र, खासगी रूग्णालयात अनावश्यक पध्दतीने इंजेक्शनचा वापर होताना दिसत आहे.
 • स्टेज ३ मधील फ ग्रुपमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे (शरिरातील जंतूसंसर्ग, अवयव निकामी होणे आदी) व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णांनाही रेमडीिसवीरचा वापर व्हावा.
 •  न्युमोनिया असला तरी त्यांची ऑक्सिजन पातळी संतुलित (९४ पेक्षा वर) असलेल्या रूग्णांसाठी रेमडीिसवीरचा वापर करू नये, त्याऐवजी फेविपिरावीर गोळ्यांचा वापर करावा. आपल्या मनाने किंवा मेडिकल स्टोअरमधून औषधे आणून खाणे टाळा. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार घ्या.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यु काळे यांनी यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी (दि.८) पत्र जारी केले असून, त्यात इंजेक्शनच्या वापरात सुसूत्रता आणण्यास सांगितले आहे. या पत्रानुसार शासनाने केलेल्या पाहणीत बहुतांश खासगी रूग्णालये १०० टक्के रूग्णांसाठी या इंजेक्शनचा वापर करत आहेत. मात्र सरकारी रूग्णालयात हे प्रमाण ३० टक्के इतके आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply