शेळीपालन करताना शेळ्या कोणत्या जातीच्या घ्याव्यात आणि संकर करण्यासाठी कोणत्या जातीचा बोकड असावा, हे दोन महत्वाचे प्रश्न असतातच. त्याच प्रश्नांच्या अनुषंगाने आपण यापूर्वी माहिती घेतली आहे. आता आज आपण बेणूच्या (पैदाशीचा) बोकडाविषयीचे काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत.
शेळ्यांच्या कळपाचा, पुढील दर्जेदार पिढीचा आणि नफ्याचा आधार असलेला बेणूचा बोकड सशक्त आणि निरोगी असावा. तसेच त्याला दररोज सकस आहार, सर्व प्रकारचा चारा आणि खुराक द्यावा. खुराकामध्ये प्रथिनयुक्त घटक असण्याची काळजी घ्यावी.
बेणूच्या बोकडाच्या सशक्त वाढीसाठीचे मुद्दे असे :
- नराचा व्यायाम होईल आणि तो लठ्ठ होणार याची काळजी घ्यावी. कारण, तो लठ्ठ झाल्यास त्याची कार्यक्षमता घटते.
- नराच्या पोटावर जर जास्त केस असतील तर त्याला शेळ्या भरताना काही अडचण येऊ शकते. त्यासाठी असे जास्तीचे केस नियमितपणे कापून घ्यावेत.
- कळपाच्या भविष्यातील गुणवत्तेचे निकष ठरवणाऱ्या बेणूच्या बोकडाकडे नियमितपणे विशेष लक्ष द्यावे. त्याच्या आहारासह लसीकरण व औषधोपचार याचीही काळजी घ्यावी.
- बेणुसाठी वापरायचा नर शक्यतो दोन वर्षे ते ३ वर्षे वयाचाच असावा. त्यापेक्षा कमी वयाचा कोवळा किंवा जास्त वय झालेला नर असल्यास जुळ्या कराडांचे आणि गर्भधारणा होण्याचे प्रमाणही घटते.
- नराला नियमितपणे प्रथिनयुक्त आहार, खनिज मिश्रण, मोड आलेली मटकी, शेंगदाणा पेंड, अ आणि ड जीवनसत्वयुक्त आहार व पूरक पोषक खाद्य द्यावे.
अशा पद्धतीने शेळ्या वेळेवर गर्भार राहण्याची आणि कळपाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी बेणूच्या बोकडाचे व्यवस्थापन करावे.
संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे
(क्रमशः)
वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळी पालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग
- ‘त्यांच्या’सह अदानीही करणार ‘रिटेल क्रांती’; अमेझॉन, रिलायन्सपुढील आव्हाने वाढणार..!
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ
- आयपीएल २०२१ : सेहवाग म्हणतो हैदराबादच्या पराभवासाठी ‘हा’ खेळाडू जबाबदार..!
- महत्वाची आठवण : लाराने आजच्या दिवशीच ‘त्यांच्या’विरोधात ठोकल्या होत्या विश्वविक्रमी ४०० धावा..!
- जेव्हा केकेआरच्या ‘त्या’ खेळाडूची पत्नी राशिदला म्हणाली ‘मॅच आम्ही जिंकणार’; वाचा भन्नाट किस्सा