Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. एकाकडेच सापडल्या तब्बल 12 रेमेडिसिव्हिर; पहा कुठे झाली ही कारवाई..!

मुंबई :

Advertisement

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमेडिसिव्हिर या औषधाला पुन्हा एकदा अभूतपूर्व मागणी आलेली आहे. खासगी रुग्णालयात सरसकट हे औषध वापरले जात असल्याने याचा काळाबाजार तेजीत आहे. त्याचवेळी रेमाडिसिव्हिर या महत्त्वपूर्ण औषधाच्या १२ इंजेक्शन मुंबई पोलिसांनी एकाच व्यक्तीकडून ताब्यात घेतल्या आहेत.

Advertisement

गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी अंधेरी (पूर्व) येथील सरफराज हुसेन यांना याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून इंजेक्शन ताब्यात घेतल्याचे शुक्रवारी एका पोलिस अधिकार्याने सांगितले. गुन्हे शाखेला अशी माहिती मिळाली होती की एक माणूस रेमाडिसिव्हिर औषध बेकायदेशीरपणे विकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी सापळा लावला गेला. त्यातून हे १२ इंजेक्शन ताब्यात घेण्यात आलेले आहेत.

Advertisement

महाराष्ट्र सरकारने गुरुवारी रेमेडिसवीरची किंमत 1,100 रुपये वरून 1,400 रुपये प्रति इंजेक्शन केली आहे. तसेच याचा काळाबाजार करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तरीही राज्यभरात सध्या याचा काळाबाजार तेजीत आहे. हे औषध मिळण्यासाठी अनेक शहरात मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. त्याचाच गैरफायदा उठवीत काहींनी याची किंमत थेट 8 हजार रुपये इतकी वाढवली आहे. काळ्या बाजारातील अशा औषध खरेदी-विक्रीवर पोलिसांचे लक्ष आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply