Take a fresh look at your lifestyle.

म्हणून घसरली अजितदादांची जीभ; पहा नेमके काय म्हटलेय आमदार सातपुतेंनी

पुणे :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. सोलापूर-पंढरपूर भागातील सहकार क्षेत्रातील दिग्गज नेतृत्व असलेल्या कल्याणराव काळे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यावरही अजितदादा यांनी भाष्य केले आहे. त्यावेळी त्यांनी ‘कुठ घालायची ती..’ असे वक्तव्य केले आहे.

Advertisement

या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपला टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी यानिमित्ताने अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंढरपूरला संतांच्या भूमीत येऊन प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित दादा अशी भाषा वापरत असतील तर यापेक्षा दुर्दैव काय! निवडणुकीतलं फिरलेलं वातावरण बघूनच अजित दादांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यानेच त्यांची जीभ घसरली असावी. अशोभनीय..

Advertisement

Ram Satpute on Twitter: “पंढरपूरला संतांच्या भूमीत येऊन प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित दादा अशी भाषा वापरत असतील तर यापेक्षा दुर्दैव काय! निवडणुकीतलं फिरलेलं वातावरण बघूनच अजित दादांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यानेच त्यांची जीभ घसरली असावी. अशोभनीय … #Pandharpur @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis https://t.co/Udrx7CegV0” / Twitter

Advertisement

ही पोस्ट लिहिताना त्यांनी अजित पवार यांच्यासह भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलेले आहे. फ़क़्त 25 सेकंदाचा व्हिडिओ कट करून आमदार सातपुते यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये भाजपवर टीका करताना अजितदादांचा तोल गेलेला आहे. त्यांच्या खास स्टाईलमध्ये भाषण करताना त्यांनी भाजपवर आणि कल्याणराव काळे यांच्या घरी हेलपाटे मारणाऱ्यांना झोंबणारी टीका केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply