Take a fresh look at your lifestyle.

करोना लस : जावडेकरांनी केला गंभीर आरोप; पहा नेमके काय म्हटलेय महाराष्ट्र सरकारबाबत

मुंबई :

Advertisement

कोरोना लस मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता कमी होण्याच्या ऐवजी वाढली आहे. महाराष्ट्रात लसपुरवठा कमी करण्याच्या मुद्द्याला उत्तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘महाराष्ट्रात सध्या तब्बल 23 लाख डोस आहेत. म्हणजे 5 दिवस लसीचा साठा पुरेल. इतर राज्यात फ़क़्त 3 ते 4 दिवसांचा साठा आहे. राज्यात जिल्हानिहाय पुरवठा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. महाराष्ट्र सरकारने तब्बल 5 लाख डोस वाया घालवले आहेत.

Advertisement

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर लस कमी प्रमाणात पुरवल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले की, गुजरात, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यांना केंद्राकडून जास्त पुरवठा केला जात आहे. वास्तविक तेथे कमी रुग्णसंख्या आहे. केंद्र सरकारने इतर देशांपेक्षा आपल्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. महाराष्ट्राला दर आठवड्याला किमान 40 लाख डोसची आवश्यकता असते. इतर देशांना लस पुरवण्याऐवजी सरकारने ते राज्यांना द्यावे.

Advertisement

त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही महाराष्ट्र सरकारच्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त दिली होती. ते म्हणाले होते की, महाराष्ट्रातून ही लस कमी झाली असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. लस वैज्ञानिक पद्धतीने पुरविली जात आहे आणि सर्व राज्यांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. आघाडी सरकारमध्ये असलेल्या कॉंग्रेसनेही सरकारवर याप्रकरणी निशाणा साधला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आज आपला देश पाकिस्तानलाही लस मोफत देत आहे. पण ते महाराष्ट्राविषयी राजकारण करीत आहेत. भाजपचे केंद्र व राज्यातील नेते महाराष्ट्राला लक्ष्य करीत आहेत. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. यापूर्वी गुरुवारी, सातारा, सांगली, पनवेल येथे लसीकरण थांबविण्यात आले. याशिवाय बुलडाण्यात फक्त एक दिवसाचा साठा शिल्लक आहे. पुण्यातही 109 लसी केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply