Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडीला झटका; पहा सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय म्हटलेय वाझे प्रकरणी

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्र सरकार व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात याप्रकरणी 5 एप्रिलला याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी कोर्टाने हा आदेश दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला झटका बसला आहे.

Advertisement

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एस.के. कौल म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गृहमंत्री म्हणून आहेत. ते गंभीर आहेत. यामध्ये देशमुख व सिंग यांनी दोघांनीही विभक्त होईपर्यंत जवळून काम केले आहे. दोघांनीही प्रतिष्ठित पद धारण केले होते. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी करू नये का असा सवाल त्यांनी केला. न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपांचे स्वरूप आणि त्यात गुंतलेल्या लोकांची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी.

Advertisement

ANI on Twitter: “Supreme Court dismisses the pleas filed by Maharashtra govt and its former home minister Anil Deshmukh challenging Bombay High Court order directing a CBI probe into allegations of corruption levelled against him by former Mumbai police commissioner Param Bir Singh. https://t.co/m0mliAHnFA” / Twitter

Advertisement

न्यायाधीश कौल म्हणाले की, याप्रकरणी दोघांचीही चौकशी झाली पाहिजे. देशमुख यांच्या वतीने न्यायालयात हजर असलेले वकील कपिल सिब्बल म्हणाले की, अनिल देशमुख यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणतीही प्राथमिक चौकशी केली जाऊ शकत नाही. त्याचवेळी अनिल देशमुख यांनी कोर्टाला सांगितले की, माझ्यावर कोणताही आधार नसताना व सुनावणी न घेता तोंडी आरोप लावण्यात आले आहेत. त्यानंतर हायकोर्टाच्या वतीने सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यावर कोर्टाने म्हटले आहे की, हे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशी करावी लागेल.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply