कोल्हापूर :
पेट्रोल-डीझेल दरवाढ झालेली असल्याने तब्बल चार वर्षांनी रिक्षाचालकांनी भाडेवाढ जाहीर झाली. त्यानुसार आता रिक्षाचे सुरवातीचे किमान भाडे २० वरून २२ रुपये करण्यात आले आहे. तर, प्रत्येक किलोमीटरचे भाडे १७ वरून १८ रुपये करण्यास मंजुरी मिळाली असून ही भाडेवाढ दि. १ मेपासून लागू होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजारपेक्षा अधिक रिक्षाचालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने एकून सर्व बाबींचा विचार करून आणि हकीम समितीच्या शिफारशीनुसार वाहनाची किंमत, घसारा, कर, विमा, दुरुस्ती देखभाल खर्च, महागाई निर्देशांक, इंधन खर्च या सर्व बाबींचा समावेश करून रिक्षाचालकां ही भाडेवाढ मंजूर केली आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दौलत देसाई, सचिव पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सदस्य प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींशी मागील आठवड्यात चर्चा केली होती. यापूर्वी २०१७ मध्ये रिक्षाभाडे वाढ झाली होती. त्यानंतर पेट्रोल, गॅसचे दर वाढले आहेत. तसेच मेंटेनन्स्, इन्शुरन्स हाही खर्च वाढला आहे. त्या सर्व गोष्टींचा विचार करून प्राधिकरणाने ही वाढ मंजूर केली आहे.
भाडेवाढ मुद्दे
रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत दीडपट भाडे |
मीटर कॅलिब्रेशनसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत |
सुरवातीचे किमान भाडे २० वरून २२ रुपये |
प्रत्येक किलोमीटरचे भाडे १७ वरून १८ रुपये |
रिक्षाधारकांसाठी नवीन दर १ मेपासून लागू |
संपादन : विनोद सूर्यवंशी
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ
- आयपीएल २०२१ : सेहवाग म्हणतो हैदराबादच्या पराभवासाठी ‘हा’ खेळाडू जबाबदार..!
- महत्वाची आठवण : लाराने आजच्या दिवशीच ‘त्यांच्या’विरोधात ठोकल्या होत्या विश्वविक्रमी ४०० धावा..!
- जेव्हा केकेआरच्या ‘त्या’ खेळाडूची पत्नी राशिदला म्हणाली ‘मॅच आम्ही जिंकणार’; वाचा भन्नाट किस्सा
- पाकिस्तानच्या माजी खेळाडूने कोहलीला बाबरकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा दिला सल्ला