Take a fresh look at your lifestyle.

अजितदादांनी दिले भाजपलाच आव्हान; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

सोलापूर :

Advertisement

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव जोडले गेले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावतानाच ‘या प्रकरणी माझी चौकशी करावी’ असे खुले आव्हानही त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपला दिले आहे. 

Advertisement

पवार आज पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पसोलापूर जिल्ह्यात आहेत. भाजप नेते व सहकाराच्या राजकारणातील नेते कल्याणराव कल्याण काळे यांनी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वाझे प्रकरणी नाव आल्याबद्दल खुलासाही केला आहे. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा भाजप आणि अजितदादा यांच्यात राजकीय कलगीतुरा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

Advertisement

पवार म्हणाले की, वाझेला कधीही भेटलो नाही. संभाषणही त्याच्याशी कधीच झाले नाही. त्यामुळे त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचे काहीच कारण नाही. तरीही या प्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा असल्याचे मग सिद्ध होईल. देशमुखांची सीबीआय चौकशी चालू आहेच त्यात माझीही चौकशी करावी. चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल की. विरोधकांकडून जाणूनबुजून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, दीपक साळुंखे, सुरेश घुले, उमेदवार भगीरथ भालके आदी उपस्थित होते.

Advertisement

पवार यांनी करोना मुद्द्यावरील राजकारणावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राला पुरेशी लस मिळत नाही. केंद्राने परदेशात लस पाठवण्याची घाई केली. मात्र, त्यांना मदत करतानाच आपल्या देशात तयार होणारी लस आधी आपल्या लोकांना मिळायला पाहिजे होती. परदेशात लस पाठवण्याऐवजी आता देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार लस द्यावी. कालच 350 कोटी लसीचं वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राला 7 लाख 50 हजार लसी मिळाल्या आहेत. ठरावीक दिवसात लसीकरण संपवायचे आहे. यासाठी शासकीय व वैद्यकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे. 

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply