बाब्बो.. मतदानासाठी दिले दोन हजारांचे बोगस टोकन; मतदाते पडले तोंडावर, पोलिसांमध्ये तक्रारही दाखल..!
चेन्नई :
मतदानामध्ये विचार आणि चांगुलपणा हा मुद्दा पन्नासेक वर्षांपूर्वीचा गायब झालेला आहे. सध्या नोट दो और वोट लो असा जमाना आहे. अनेकदा मतदाते दोन्ही-तिन्ही उमेदवारांकडून पैसे घेऊन पाहिजे त्यालाच मतदान करीत असल्याचे किस्से आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र, एका बहाद्दर उमेदवाराने थेट मतदारांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.
निवडणुकांच्या वेळी नेते मोठी आश्वासने देतात आणि निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना विसरतात असेच सहसा घडते. पण तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील नेता आपल्या आश्वासनाची खैरात इतक्या लवकर विसर पडला की मतदारांना विचार करायलाही वेळ मिळाला नाही. उमेदवाराने मतदारांना सांगितले की, त्यांनी त्याला मत दिल्यास तो त्यांना दोन हजार रुपये देईल. मतदानापूर्वी प्रत्येकी दोन हजार रुपयांचे कुपनही त्यांनी वाटप केले. मतदानानंतर मतदार जेंव्हा कूपन कॅश करून घेण्यासाठी पोहोचले तेंव्हा त्यांना मोठा धक्का बसला..!
तंजावूर जिल्ह्यातील कुंभकोणम शहरात बुधवारी पहाटे सुमारे २०० लोकांनी किराणा दुकानाच्या बाहेर रांग लावली. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करताना स्थानिक उमेदवाराने दोन हजार रुपयांची कूपन वाटली. मतदानाच्या दुसर्या दिवशी किराणा दुकानात रोख रक्कम मागितल्यावर सर्व मतदाते तोंडावर पडले. कारण, सकाळी सुमारे 200 लोक दुकानाच्या बाहेर उभे राहिलेले दिसल्यावर दुकानदार शेख मोहम्मद खूष झाले. परंतु, रांग कशासाठी आहे हे कळल्यावर त्यांच्या डोक्याचा ताप वाढला. चक्क दुकानदाराची आणि उमेदवार या दोघांची ओळखही नव्हती.
दुकानदाराचा नकार ऐकून लोक संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ सुरू केला. यानंतर संतप्त जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी तपास करून अम्मा मक्कल मुन्नेत्र कळगम (एएमएमके) उमेदवार कानगराज यांनी अशी कूपन वाटली असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कानगराजांविरोधात कुंभकोणम पूर्व पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..
- खताची खरेदी करताना घ्या ‘ही’ महत्वाची काळजी; पहा नेमके काय केलेय ‘शिवार’ने आवाहन
- बाब्बो.. सेवांच्या नावाखाली गरिबांच्या खिशात हात; पहा बँकांनी कसे लुटलेय आपल्याला..!
- शेळीपालन : लसीकरणाचे वेळापत्रक नक्की फॉलो करा; वाचा आणि अंमलबजावणीही करा
- शिक्षक-विद्यार्थी सर्वेक्षणातून पुढे आले ‘हे’ 5 मुद्दे; दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी
- ‘त्यांच्या’सह अदानीही करणार ‘रिटेल क्रांती’; अमेझॉन, रिलायन्सपुढील आव्हाने वाढणार..!