करडे विक्री हा शेळीपालनातून अर्थार्जनाचा प्राधान्याचा मुद्दा आहे. त्यामुळे करडे व त्यांच्या पाठी यांच्या योग्य वाढीसाठी आहार आणि औषधोपचार यांचे सुयोग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गाभण शेळ्यांची योग्य काळजी घ्यावी. तसेच गाभण असल्यावर शेवटच्या महिन्यात त्यांना लांब चरायला नेऊ नये. कळपातील आक्रमक व मारामारी करणाऱ्या बोकड व शेळ्यांना गाभण शेळ्यांपासून लांब ठेवण्याची काळजी घ्यावी.
कराडांच्या वाढीसाठीचे महत्वाचे मुद्दे :
- गोठ्यातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. तिथे किंवा बाहेरील बाजूस मच्छर व माश्या होणार नाहीत. शेळ्यांच्या कळपाला गोचीड व पिसा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- आहाराचे योग्य व्यवस्थापन करावे. त्यासाठी वयानुसार देण्याच्या आहाराचे मुद्दे लक्षात घेऊन नियोजन करावे.
- हगवण लागलेल्या कराडांना वेगळे ठेवावे. तसेच त्यांना स्वच्छ धुण्याची काळजी घ्यावी.
- थंडीपासून नवजात कराडांना संरक्षण देण्यासाठी त्यांना वेगळ्या कोपीमध्ये किंवा बांबूच्या टोपलीत अथवा गोणपाटाच्या कोपीमध्ये ठेवावे.
- जर थंडी जास्त असेल तर अशावेळी त्या भागात १०० वॅट क्षमतेचा पिवळा बल्ब लावून उष्णता निर्माण करावी.
- दुध पाजताना दिवसातून ३-४ वेळा गरजेनुसार पाजावे. त्याच पद्धतीने थोडे मोठे झाल्यावर त्यांना बाळसुग्रास द्यावा.
- उन्हाळ्यात कराडांना स्वच्छ पिण्याचे पाणी थंड असेल असेच द्यावे.
- गोठ्यातील जास्त गर्दीमुळे आंत्रविषार, हगवण यासह इतर आजारांची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी.
- वेळेवर जंत निर्मूलन व लसीकरण करावे.
- कराडांच्या निरोगी व योग्य वाढीसाठी त्यांना चांगल्या दर्जाचे पशुखाद्य खाऊ घालावे.
पाठी अर्थात मोठ्या कराडांची काळजी घेण्याचे मुद्दे :
- बोकडांच्या विक्रीतून अर्थार्जन हा जसा मुद्दा आहे. तसेच पाठी म्हणजे फिमेल गोट यांच्या वाढीतून शेळ्यांची संख्या वाढवणे हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यानुसार पाठींना योग्य आहार द्यावा.
- पाठी मोठ्या झाल्यावर त्यांचे ९ महिन्यांनी शेळीत रुपांतर होते. अशावेळी लगोलग त्यांना भरून घेऊ (बोकडाने लावणे) नये. वाढीच्या वेगानुसार १० ते १२ महिन्यांनी त्यांना बोकडाकडे न्यावे.
- पाठींना आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवून द्यावे. संतुलित आहार हाच वजन वाढीचा राजमार्ग आहे. तूप खाल्ले की रूप येत नाही, हा नियम लक्षात घेऊन खाद्य व्यवस्थापन करावे.
- खनिजांचे मिश्रण हे शेळ्यांना खूप महत्वाचे आहे. पाठींनाही ते द्यावे. तसेच चाटण विटा लटकावून ठेवल्यास त्यांना लागेल तेंव्हा त्या तिला चाटतात.
- पाठी असलेल्या कराडांना वळलेला चारा आणि हिरवा चारा यांचे प्रमाण योग्य पद्धतीने द्यावे. तसेच त्यांना मनसोक्त खायला मिळेल याची काळजी घ्यावी.
संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे
(क्रमशः)
वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळी पालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय