Take a fresh look at your lifestyle.

कोरना अपडेट : पहा कुठे उपलब्ध आहे करोना लस आणि कुठे बंद झाले लसीकरण

पुणे :

Advertisement

सध्या राज्यात करोनाचे वाढते रुग्ण आणि त्यासाठी होत असलेले लसीकरण हा मुद्दा आरोग्याचा राहिलेला नसून थेट राजकीय झाला आहे. एकीकडे केंद्राकडून लस आणि मदत दिली जात नसल्याचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारकडून मांडला जात असतानाच, यावर भाजपने सरकारचे वाभाडे काढणारे आरोप केलेले आहेत. अशावेळी सध्या राज्यभरात लसीकरण केंद्रावर तुटवडा असल्याचे चित्र आहे.

Advertisement

पहा कुठे कशा पद्धतीने केली जात आहे लस आणि काय आहेत लसच्या अपडेट :

Advertisement
  1. सातारा, सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण बंद आहे.
  2. विदर्भातील अमरावती, वर्धा, बुलढाणा, गोंदियात सुद्धा लसीचा तुटवडा आहे.
  3. महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
  4. यवतमाळ जिल्ह्यात कोरोना लसीचे 16 हजार 720 डोस शिल्लक 
  5. गोंदिया जिल्ह्यातील लसीकरण कालपासून बंद
  6. कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा. 19 हजार डोस शिल्लक असून लस संपल्याने महापालिकेने 9 लसीकरण केंद्रे बंद 
  7. चंद्रपूर जिल्ह्यात फ़क़्त 4800 लसीचे डोस शिल्लक आहेत.
  8. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 21 केंद्रावर लसीकरण करण्यात येत असताना लसीचा पुरवठा होत नसल्याने आजपासून लसीकरण बंद करण्यात आले आहे
  9. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज डोस उपलब्ध झाले नाहीत तर पुढील लस मिळेपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे.
  10. मुंबईतील सर्व शासकीय केंद्रे सुद्धा लसपुरवठ्याअभावी बंद होणार आहेत. 120 सेंटर्सपैकी 26 खाजगी लसीकरण केंद्र बंद झाली असून त्यात एच.एन.रिलायन्स, ब्रिच कॅन्डी, हबीब, भाटीया, एलिझाबेथ, लायन हॉस्पिटल, सिटी केअर, लाईफलाईन, भाभा हॉस्पिटल आदि लसीकरण केंद्रांचा त्यात समावेश आहे.

संपादन : संतोष शिंदे  

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply