Take a fresh look at your lifestyle.

म्हणून नाना पटोलेंनी केलाय मोदी सरकारचा निषेध; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

‘लस अभावी सिंधुदुर्गातील लसीकरणही बंद होण्याच्या मार्गावर’ आणि ‘मुंबईतील 50 टक्के लसीकरण केंद्रे लसपुरवठ्याअभावी बंद, लस न मिळाल्यास परवा मुंबईतील लसीकरण ठप्प होणार’ अशी बातमी ‘एबीपी माझा’ने दिली आहे. त्या बातमीची लिंक शेअर करून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेच्या जिवाची कोणतेही घेणेदेणे नाही… यांना फक्त आणि फक्त राजकारण करायला हव….. याठिकाणी मी केंद्र सरकारचा मी निषेध व्यक्त करतो.

Advertisement

मुंबईतील 120 लसीकरण केंद्रापैकी 26 खाजगी लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. एच.एन.रिलायन्स, ब्रिच कॅन्डी, हबीब, भाटीया, एलिझाबेथ, लायन हॉस्पिटल, सिटी केअर, लाईफलाईन, भाभा हॉस्पिटल ही लसीकरण केंद्र बंद झालेली आहेत. मुंबईला लस मिळाली नाही तर परवा संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होणार आहे.

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद, 11 जिल्हा रुग्णालयाअंतर्गत येणारी रुग्णालये, 7 खासगी रुग्णालयात लसीकरण केलं जात आहे. मात्र आज डोस उपलब्ध झाले नाहीत तर पुढील लस मिळेपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे. पनवेल महानगरपालिकेला लसीचा पुरवठा होत नसल्याने आजपासून लसीकरण बंद करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अडचणीत भर पडली आहे. राज्यभरात सध्या सगळीकडे असेच चित्र आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply